शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांच्या फाईली ‘लेखा’त रेंगाळतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:36 IST

मनपा स्थायी समिती : भामरे, नाईकांची बदली करा, संतोष खताळ यांची भूमिका

धुळे : प्रभागातील विकास कामांच्या फाईली या महापालिकेच्या लेखा विभागात अक्षरश: रेंगाळतात़ त्यांना अंतिम मंजुरी मिळत नाही़ परिणामी नगरसेवकांनाच प्रशासनाकडे एका कामांसाठी वारंवार चकरा माराव्या लागतात़ प्रभागातील कामे मार्गी लागत नसल्याने लेखाधिकारी नामदेव भामरे, कर्मचारी प्रदीप नाईक यांची बदली करा अशी संतप्त भूमिका नगरसेवक संतोष खताळ यांनी घेतली़ ठेकेदाराच्या खर्चाने अधिकारी आणि कर्मचारी कशी मज्जा करतात असा आरोप करत त्याचे बॅनरही सभागृहात झळकविण्यात आले़ हा विषय दिवसभर चर्चेत राहिला़ महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी पार पडली़ यावेळी सभापती युवराज पाटील, उपायुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह स्थायी समिती सदस्य, विभाग प्रमुख उपस्थित होते़ महापालिकेच्या नगरसेवकांची कामे ही वेळेवर व्हावीत यासाठी त्यांच्या विविध फाईली या आवश्यक त्रुटी पूर्ण करुन त्या अंतिम मंजुरीसाठी तात्काळ प्रशासनाकडे सादर झाली पाहीजे, परंतु तसे होताना दिसत नाही़ लेखा विभागातील नामदेव भामरे, प्रदीप नाईक हे त्यांच्या मर्जीनुसार कामे करतात़ विचारणा केल्यावर नगरसेवकांना उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात़ केवळ वेळ मारुन नेण्याचा हा प्रकार असल्यामुळे कामात हलगर्जीपणा करणाºया या दोघांची तातडीने बदली करावी अशी मागणी नगरसेवक संतोष खताळ यांनी केली़ या मागणीला इतरांनीही दुजोरा दिला़ नगरसेविका कशीश उदासी यांनी केवळ सिंधी बांधवांवर प्लास्टिकबंदी संदर्भात कारवाई करण्यात येत असून सुमारे ९० टक्के कारवाई ही केवळ सिंधी व्यावसायिकांवरच का केली जाते? असा सवाल उपस्थित करुन महापालिका प्रशासनाचा धिक्कारही त्यांनी नोंदविला़ यावर प्लास्टिकबंदी संदर्भात कुठलाही पक्षपात करु नये असा आदेश सभापती युवराज पाटील यांनी दिला़ अमिन पटेल यांनी तापी योजनेच्या पाईपलाईनला गळती का लागते असा सवाल उपस्थित करत योजनेची पाईपलाईन नव्याने टाकण्याची मागणी केली़ यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात यावा, जेणेकरुन प्रभागातील नागरीकांना पाण्याचा त्रास होणार नाही़ पावसाळ्यात पांझरेला महापूर आला, तरीही धुळेकर नागरीकांना आठ-आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली़ यावर शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरु असून संबंधित अधिकारी हे पहाटे प्रभागात फिरत आहेत़ नियोजनासाठी त्यांना १० दिवसांची मुदत दिली असल्याचे सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे