शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कवडीमोल भावात कापूस विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 10:58 IST

अर्थे परिसर : कापसाला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग

लोकमत न्यूज नेटवर्कअर्थे : कापसाला योग्य भाव नसल्याने शिरपूर तालुक्यातील अर्थे परिसरातील शेतकºयांचा अपेक्षाभंग झाला आहे. अखेर स्थानिक व्यापाºयांना मिळेल त्या दराने कापूस विक्री करण्याकडे शेतकºयांचा कल दिसून येत आहे.खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी असतानाही परिसरातील शेतकºयांनी शेतात कापूस लागवड केली. कुपनलिकेतील जेमतेम पाण्याचा वापर करीत ठिबक सिंचनाच्या माध्यमातून कमी पाण्यावर कापसाचे उत्पन्न घेतले. परंतू यावर्षी कापसाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे कापसाचा भाव वाढेल या आशेने शेतकºयांनी घरातच कापूस साठवून ठेवला होता. परंतू मकरसंक्रांतीनंतरही कापसाचे भाव न वाढल्याने कापूस घरातच पडून आहे.साठविलेल्या कापसाला कीडशेतात आलेला कापूस घरातच दोन ते तीन महिने पडल्यामुळे या कापसाला किड लागली आहे. यामुळे शेतकºयांच्या कुटुंबातील सदस्यांना बारीक पुटकुळ्या येत आहेत. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.शेतकºयांच्या घरात वेचणीनंतर जेव्हा कापूस आला तेव्हा कापसाचे भाव सहा ते सात हजाराच्या पुढे होते. कापसाच्या भावात अजून वाढ होईल, या आशेने शेतकºयांनी आपल्या घरातच कापूस भरून ठेवला होता. मात्र, जागतिक बाजारपेठेत व भारताशेजारील देशात कापसाला उठाव नसल्याने भाव घसरले आहेत. कापसाचे भाव ५४०० ते ५५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. भाव वाढतील, या आशेने शेतकरी अजूनही कापूस विकायला तयार नाहीत. त्यामुळे घरातील कापसाला कापसाला किडे लागले आहेत. यामुळे उन्हाळ्याच्या अगोदर कापूस जर विकला गेला नाही तर शेतकºयांना कापसामुळे विविध त्वचारोगांना सामोरे जावे लागणार आहे.यावर्षी कापसाची लागवड जास्त झाली. मात्र, त्यापटीत उत्पन्न कमीच मिळाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला कापसाचे भाव सात ते आठ हजार रुपयांपर्यंत पोहोचतील, या आशेने शेतकºयांनी कापूस आपल्या घरातच साठविला.अर्थे परिसरासह शिरपूर तालुक्यात शासनाकडून बाजार समितीत व इतर ठिकाणी कापसाची खरेदी होताना दिसत नाही. त्यामुये मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील व स्थानिक व्यापाºयांना कापूस विकण्याकडे शेतकºयांचा कल आहे. येत्या काही दिवसात योग्य भाव न मिळाल्यास मिळेल त्या दराने कापूस विकण्याशिवाय शेतकºयांपुढे पर्याय उरलेला नाही.

टॅग्स :agricultureशेती