तºहाडी : चार दिवसापासून अवकाळी पावसाने उघडीप दिल्याने शेतातील फुटलेल्या कापूस वेचणीची लगबग शेतकऱ्यांकडून सुरु आहे. काही शेतातील उभे असलेल्या ज्वारी, मका, सोयाबीन पिकांची कापणी तसेच काढणीलासुध्दा वेग आल्याने शेतमजूर व्यस्त झाले आहेत. यामुळे फूटलेल्या कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर मजूर शोधण्याची वेळ आलेली आहे.मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातल्याने कपाशी व मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचून चिखल झाला होता.यामुळे कपाशीचे बोंड फूटले नव्हते. परंतू मागील चार दिवसापासून पावसाने उघडीप दिली असून ऊन पडत आहे. यामुळे तापत्या उन्हात कपाशी बोंड फूटल्याने शेताने पांढराशालू पांगरल्याचे दिसत आहे. कापूस वेचणी करण्याची लगबग शेतकºयांना लागलेली आहे. परंतू अवकाळी पावसामुळे थैमान घातल्याने अनेक शेतात मका, ज्वारी, सोयाबीन कापणी व काढणीला विलंब झाल्याने शेतातील सोयाबीन पिकांची कापणी व काढणीची संपुर्ण कामे सुरु असून सोयाबीनची मजूरी जास्त मिळत असल्याने सर्वाधिक शेतमजूर सोयाबीन शेतीकडे जात असल्याने शेतातील फूटलेल्या कापसाची वेचणी करण्याकरिता मजूर मिळत नाही.इकडून तिकडून मोजकेच मजूर मिळाले तरी २० किलो कापुस वेचणी करिता १०० ते १२० रुपये मजूरी देण्यात येत आहे. तसेच मजुरांना घरून शेतात ये-जा करण्यासाठी रिक्षा भाडे सुद्धा देण्याची वेळ शेतकºयांवर आलेली आहे. तरीही शेतातील फूटलेल्या कपाशीची वेचणीकरिता शेतकºयांना मजूर मिळत नसून बाहेरगावावरून जादा मजूरी देवून मजूरांना घेवून यावे लागत असल्याने अगोदरच पावसाने त्रस्त झालेल्या शेतकºयांना जादा दराने सोयाबीन काढणी व कापूस वेचणी करावी लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.अवकाळी पावसामुळे शेतातील मक्याचे पीक खराब झाले आहे. दुसरीकडे कपाशीचे बोंड फूटले आहे. मात्र, कपाशी वेचणीसाठी मजूर सूध्दा मिळत नाही. यामुळे दुहेरी संकटात शेतकरी सापडला असून २० किलो कापूस वेचणीकरिता शंभर ते एकशे वीस रुपये मजूरी मागत असून तेवढी रक्कम दिल्यावरही वेळेवर मजूर मिळत नाही.-धनराज करके, शेतकरी तºहाडीदोन एकर शेतात पिकांची लागवड केली आहे. परंतू अवकाळी पावसाने शेतातील कापसाचे पिक खराब झाले असून उरले सुरलेल्या कापूस पिकाचे बोंड फूटले आहे. मात्र, कापूस वेचणीकरिता मजूर मिळत नाही. दररोज कापूस वेचणी करिता मजूर शोधण्याची वेळ आलेली आहे.-सुभाष भामरे, तºहाडी
कापूस फुटला; पण मजूर मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 23:14 IST