शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मालपूर परिसरात कापसाचे क्षेत्र घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 17:45 IST

पावसाच्या पाण्यावर कापूस लागवडीचे नियोजन : अमरावती मध्यम प्रकल्पात अल्प जलसाठा

ठळक मुद्देवीस हजार लोकवस्तीच्या संपूर्ण गावासाठी तहान भागविण्याची मदार या प्रकल्पावरच आहे.या प्रकल्पानजीक विहिरी खोदून सध्या पाणी टंचाईचा लढा यशस्वीपणे सुरू आहे. मात्र, विहिरीतील पाणीही संपण्याच्या मार्गावर आले आहे. शेत शिवारातील विहिरीतही ठणठणाट असल्यामुळे शेकडो कुपनलिकांची जलपातळी घटली आहे. त्यामुळे शेती करण्यासाठी येथील शेतकºयांना आता पावसाच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर (ता. शिंदखेडा, जि. धुळे) : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची मदार अमरावती मध्यम प्रकल्पावर आहे. मात्र, या प्रकल्पातील मृतसाठा संपण्याच्या मार्गावर आला आहे. येथील परिसरात यंदा कापसाच्या लागवडीचे क्षेत्र घटणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच कापूस लागवडीचे नियोजन आता पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून मालपूर भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. यावर्षी अमरावती मध्यम प्रकल्पाने प्रथमच येवढा तळ गाठल्याचे दिसून येत आहे. परिणामी, या प्रकल्पात आता चक्क पाण्याचे डबके साचल्याचे दिसून येत आहे. त्या डबक्यातील जलसाठाही संपण्याच्या स्थितीत आहे. दरवर्षी मे महिन्यात कापूस लागवड येथील परिसरात केली जात होती. मात्र, पाणी नसल्याने कापूस लागवड लांबणीवर पडली आहे.  चैत्र महिन्याच्या शेवटी गावात असलेल्या यात्रेनिमित्त प्रकल्पातील सांडव्यात पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीकाठावरील विहिरींचा जलस्त्रोत वाढत होता. तसेच काही शेतकºयांना पाणी उपसा करण्याच्या परवानगी दिल्यामुळे मोटार जलवाहिनीद्वारे शेतात पाणी उपलब्ध होत होते. तसेच उजव्या व डाव्या कालव्यातून आवर्तने होत असल्यामुळे मालपूरसह सुराय, कलवाडे, कर्ले, वैंदाणे, खर्दे, मांडळ, मोयाणे, चुडाणे आदी गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड होताना पाहावयास मिळत होती. मात्र, सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने  कापूस लागवड लांबणीवर जाऊन पावसाच्या पाण्यावरच लागवडीचे नियोजन करता येणार आहे.

१२ वर्षांपासून प्रकल्प भरला नाही पावसाच्या पाण्यावरच येथील अमरावती मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नसल्याची परिस्थिती गेल्या १२ वर्षांपासून दिसून येत आहे. मालपूरसह परिसरातील गावांसाठी अमरावती, मध्यम प्रकल्प व्यतिरीक्त दुसरा जलस्त्रोत नाही; त्यामुळे मालपूरसह लगतच्या संपूर्ण परिसरात पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थ व शेतकºयांना करावा लागत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे