मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियानातून सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी राज्यभर शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत धुळे येथे कानुश्री मंगल कार्यालयात मंगळवारी मेळावा झाला. धुळे, नंदुरबारचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांची प्रमुख उपस्थित होती.
महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील यांनी शिवसंपर्क अभियानाची माहिती दिली. उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, छोटू सोनार, महानगर प्रमुख मनोज मोरे, महिला संपर्कप्रमुख प्रियंका घाणेकर, साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, युवासेना अधिकारी पंकज गोरे यांनी आपले विचार मांडले. प्रवीण साळवे, प्रकाश शिंदे, समाधान शेलार, जितेंद्र जैन, पंडित जगदाळे आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.
पक्षाच्या ध्येयधोरणानुसार समाजातील विविध घटकांसाठी कार्य करणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मोहनसिंग तनवाणी, बापू मराठे, भटू लंगोटे, नारायण संतानी, मूलचंद लालवाणी, छोटू घेर, राजेंद्र गुजर, अशोक तेले, जीवा पटेल, प्रकाश खोंडे, अशोक उचाळे, वसंत सूर्यवंशी, हिरामण पवार, तुकाराम गवळी, श्याम चिते, चंद्रकांत बारी, रमेश वाडीले, किसान ढवळे, बाबू पटेल, गोरख जगताप, बबन नागरे, विष्णू पाटील आदींचा सत्कार झाला.
यावेळी ग्रामीण जिल्हाप्रमुख रावसाहेब साळुंखे, माजी नगराध्यक्ष महेश मिस्त्री, डॉ. तुळशीराम गावित, डॉ. सुशील महाजन, गुलाब माळी, मनीषा जोशी, जयश्री वानखेडे, सुनीता शिरसाठ, सर्व उपमहानगरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी, युवासेना, युवती सेना, एस. टी. कामगार सेना, कामगार सेना, वाहतूक सेना यांच्यासह विविध भागांतून शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.