शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीत कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 12:41 IST

शिरपूर : ३ आॅगस्टपर्यंत पंचायत समितीचे कार्यालयीन कामकाज बंद

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील पंचायत समितीतील एक कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्यामुळे ३० जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे़ ४ आॅगस्टपासून कार्यालय पूर्ववत सुरू राहील असे बीडीओ युवराज शिंदे यांनी सांगितले़येथील पंचायत समितीतील काही कार्यालयीन कर्मचारी धुळ्याहून ये-जा करीत असतात़ त्यातील एकास त्यास जाणवू लागल्यामुळे त्यांनी स्वॅब दिला होता़ २९ रोजी रात्री उशिरा आलेल्या अहवालात ते बाधित आढळून आलेत़ त्यामुळे ३० रोजी येथील पंचायत समिती कार्यालयाला समजल्यानंतर तातडीने फवारणी करून कार्यालयाला सुट्टी जाहिर करण्यात आली़ त्यामुळे ३० जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे़ दरम्यान, अधिनस्त असलेले अधिकारी वा क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहणे आवश्यक आहे, तसेच त्यांनी भ्रमणध्वनी सुरू ठेवावेत़ ४ आॅगस्टपासून पंचायत समिती कार्यालय नियमित सुरू राहील असा आदेश बीडीओ शिंदे यांनी काढला आहे़गेल्या जुन महिन्यातील ३० दिवसापैकी ४ दिवस वगळता उर्वरीत २६ दिवसात ३८१ कोरोना बाधित आढळून आले होते़ त्यापैकी १५ जणांचा मृत्यु झाला होता़ जुलै महिन्याच्या ३० दिवसापैकी ४ दिवस वगळता उर्वरीत २६ दिवसात ४१७ बाधित आढळून आले आहेत, त्यामध्ये ७ जणांचा मृत्यु झाला आहे़ म्हणजेच गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात बाधितांची संख्या ३६ ने अधिक वाढलेली आहे़शहरासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरानाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे़ शहरी भागातील ८८ वसाहतींमध्ये कोरोनाने शिरकाव करून ५१३ रूग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत तर ग्रामीण भागातील ४४ गावांमध्ये ३२२ कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत़ दरम्यान, शहरात कोरोना बाधितांची संख्या कमी-कमी होत असतांना ग्रामीण भागात झपाट्याने संख्या वाढू लागली आहे़दरम्यान, ३० जुलै दुपारपर्यंत या तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ८३५ पर्यंत पोहचली आहे़ आतापर्यंत ६४४ कोरोनामुक्त झाले आहेत़