धुळे जिल्ह्यात शंभर टक्के कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी व्हावी, तसेच यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहे; मात्र दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती; मात्र शिवसेनेने पाठपुरावा करून अखेर देवपूर भागातील अशा व्यक्तीसाठी लस घरपोच उपलब्ध करून दिली आहे.
ज्येष्ठ नागरिक, अंथरुणाला खिळलेल्या आणि आजारी अशा लसीकरण केंद्रावर नेणे शक्य नसलेल्या नागरिकांचे घरोघरी जाऊन यशस्वी लसीकरण करण्यासाठी घरोघरी लसीकरणाचा निर्णय देवपूर शिवसेनेने घेतला आहे. २२ सप्टेंबरपासून देवपुरातील प्रभात नगरातून घरोघरी लसीकरण उपक्रमाला सुरुवात झाली. शिवसेना उपमहानगर प्रमुख ललित माळी यांनी माहिती दिली आहे. कमलाकर काशीनाथ भंडारी या ८० वर्षीय वृद्ध व्यक्तींना (रा. १०२, प्रभात नगर, देवपूर, धुळे) यांना घरी जाऊन लसीकरण करण्यात आले. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री, महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी व लसीकरण प्रभारी डॉ. पल्लवी रवंदळे, डॉ. शिंदे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख मनोज मोरे, महानगरप्रमुख सतीश महाले, उपमहानगरप्रमुख देवीदास लोणारी, माजी शहरप्रमुख चंद्रकांत गुरव, माजी नगरसेवक नितीन शिरसाठ, उपमहानगर प्रमुख ललित माळी, राजेंद्र मराठे, हरीश माळी आदी उपस्थित होते.