धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल विभागातील १५२ कर्मचाऱ्यांची बुधवारी काेरोनाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डाॅ.महेश मोरे यांनी दिली.काही दिवसांपुर्वी जिल्हाधिकारी संजय यादव यांना काेरोनाची लागण झाली आहे. खबरदारी म्हणून मंगळवारी मनपा प्रशासनाच्या मदतीने येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रॅपिड ॲटिजेन टेस्ट घेण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 15:50 IST