शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात सततच्या पावसामुळे कपाशीची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 11:49 IST

मूग, उडीदचे नुकसान, कपाशीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता

आॅनलाइन लोकमतधुळे : यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात खरीपाची पेरणी १०० टक्के झाली आहे. मात्र सतत पडत असलेल्या पावसामुळे त्याचा विपरीत परिणाम खरीपाच्या पिकांवर होऊ लागला आहे. अतिपावसामुळे शेतात वाफ होऊ शकत नाही. त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर होऊ लागला आहे. वाफ होत नसल्याने, कपाशीची वाढ काही प्रमाणात खुंटलेली आहे. याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गेल्या तीन वर्षांपासून धुळे जिल्ह्याला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहे. अपेक्षित पाऊस नसल्याने, त्याचा परिणाम खरीपाच्या लागवडीवर होत होता. तीन वर्षात १०० टक्के खरिपाची पेरणीच होऊ शकली नव्हती.यावर्षी परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. जून महिना वगळता जुलै ते सप्टेंबर दरम्यान सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच खरिपाची १०० टक्के पेरणी झाली.दमदार पावसामुळे पिकांची वाढही चांगल्या प्रकारे झाली. मात्र सततच्या पाण्यामुळे उडीद-मूगाला काही प्रमाणात फटका बसला आहे.शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कपाशीची जिल्ह्यात तब्बल २ लाख २४ हजार ४५७ हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. कपाशीच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचे सर्व आर्थिक नियोजन अवलंबून असते.पावसामुळे कपाशीची उगवण चांगल्या प्रकारे झालेली आहे. झाडांना फुलही लागली आहे. भाद्रपद महिन्यात कडकं उन्ह पडतात, त्यामुळे पिकांची वाढ चांगल्याप्रकारे होत असते. परंतु यावर्षी भाद्रपदातही दमदार पाऊस होत असून, अभावानेच कडक उन्ह पडते आहे. उन्हाअभावी शेतात वाफ होत नसल्याने, कपाशीची वाढ खुंटू लागली आहे. ऐन कैरी भरण्याच्या कालावधीतच कपाशी पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ लागल्याने, त्याचा फटका उत्पन्नावर बसण्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे आता वरूण राजाने विश्रांती घ्यावी व कडक उन्ह पडावे अशी प्रार्थना करण्याची वेळ बळीराजावर येऊन ठेपलेली आहे.ज्वारी, बाजरीवरही परिणामसतत पडणाºया पावसाचा खरीपातील ज्वारी व बाजरी या पिकांवरही काहीसा परिणाम होऊ शकतो.हा कालावधी बाजरीचे दाणे भरण्याचा आहे. यासाठी कडक उन्हाची गरज आहे. मात्र रोज ढगाळ वातावरण, अधूनमधून पाऊस पडत असल्याने, त्याचा परिणाम पिकाच्या उत्पन्नावर होऊ शकतो. अर्थात बाजरी काढणीला अजून १५ ते २० दिवसांचा कालावधी बाकी आहे. येत्या काळात पाऊस थांबला तरी बाजरीचे उत्पन्न चांगले येऊ शकते. तीच स्थिती ज्वारीची देखील आहे.

टॅग्स :Dhuleधुळे