शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीविरोधात ग्राहक मंचात जाणार

By admin | Updated: February 3, 2017 00:58 IST

महापालिका : मीटरच्या बिघाडामुळे अधिक बिलाची आकारणी, 6 कोटींची मागणी

धुळे : शहरातील पथदिव्यांपोटी वीज कंपनीकडून मनपाला आकारले जाणारे वीज बिल मीटरच्या बिघाडामुळे अंदाजे आकारण्यात आले होत़े सदरच्या बिलावर 15 टक्के व्याजासह रकमेची मागणी मनपाने केली असून ग्राहक मंचात जाण्याचा इशारा दिला आह़े शहरात मनपाचे टय़ूबलाईट 3 हजार 300, सोडियम व्हेपर 4 हजार 900, मेटल हलाईड 2 हजार 100, सीएफएल 2 हजार 400 असे एकत्रित 12 हजार 800 पथदिवे असून 35 चौकात 200 ते 400 व्हॅटचे हायमास्ट लावण्यात आले आहेत़ या सर्व पथदिव्यांवर दरमहा 28 लाखांचे वीज बिल भरण्यात येत़े शिवाय त्यांच्या देखभाल दुरुस्तीवर दरमहा सरासरी 5 लाख आणि वर्षाला 65 लाखांचा खर्च महापालिकेला करावा लागतो़ पथदिव्यांच्या वीज वापराचे रीडिंग घेण्यासाठी असलेले 29 मीटर 2012 पासून नादुरुस्त होत़े त्यामुळे महावितरण कंपनीकडून 2012 ते 2015 या तीन वर्षाच्या कालावधीत अंदाजे रीडिंग दाखवून वीज बिलाची आकारणी करण्यात आली़ दरम्यान, ही बाब मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महावितरण कंपनीशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला व नादुरुस्त मीटर बदलून देण्याची मागणी केली. अखेर अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा झाल्यानंतर 2015 मध्ये नादुरुस्त मीटर बदलण्यात आल़े 2012 पासून वाढीव वीज बिलदरम्यान, नादुरुस्त मीटरची दुरुस्ती झाल्यानंतर आलेले वीज बिल व तत्पूर्वी 2012 पासून आलेले वीज बिल यात प्रचंड तफावत आढळून आली़  त्यामुळे 2012 पासून मनपाला वीज बिलाची वाढीव आकारणी झाल्याचे स्पष्ट झाले असून या कालावधीत मनपाला आलेल्या 18 बिलांची रक्कम  प्रत्येकी 79 लाख 81 हजार 948 इतकी असणे अपेक्षित होत़े मात्र सरासरी देयक वीज बिल 1 कोटी 36 लाख 98 हजार 716 वसूल करण्यात आले आह़े त्यामुळे मनपाने 2012 पासून नियमानुसार आकारणी वगळता जास्तीचे भरलेले 84 लाख 16 हजार 768 रुपये व त्यावरील 2012 पासूनचे 15 टक्के व्याज अशीे एकूण 6 कोटी 26 लाख 91 हजार 750 रुपयांची मागणी मनपाने सातत्याने वीज कंपनीकडे केली आह़े दरम्यान, मनपा प्रशासनाने वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना पत्र दिले असून संबंधित रक्कम तत्काळ वर्ग करावी, उचित निर्णय न घेतल्यास ग्राहक मंचात तक्रार करण्यात येईल, असा इशारा दिला आह़े