शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस-भाजपाच्या पदाधिका-यांमध्ये शाब्दीक चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 16:43 IST

पालकमंत्री व अधिका-यांना घेराव : कार्यक्रमाला निमंत्रित करूनही दिले नाही शेतकºयांना प्रमाणपत्र

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात कॉँग्रेस व शेतकºयांची घोषणाबाजी सुरू होती. तेव्हा भाजपाचे हिरामण गवळी व भाजपाचे काही पदाधिकारी मध्यस्ती करण्यासाठी गेले. तेव्हा कॉँग्रेस व भाजपाच्या पदाधिकाºयांमध्ये एकच खडाजंगी झाली. त्यानंतर काहींनी मध्यस्ती केल्यामुळे वातावरण शांत झाले. यानंतर सत्काराच्या कार्यक्रमानंतर संतप्त शेतकºयांनी पालकमंत्री भुसे, जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांना घेराव घातला. त्यानंतर संतप्त झालेल्या पाच शेतकºयांचा सत्कार कार्यक्रमानंतर पुन्हा करण्यात आला.कार्यक्रमानंतर पाच जणांचा केला सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्हाधिकारी कार्यालयातील  नियोजन भवनात बुधवारी आयोजित कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमासाठी ४० शेतकºयांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ २० शेतकºयांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरीत झाले. परिणामी, संतप्त शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांसोबत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी संतप्त शेतकºयांना समज देण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी गेले असता कॉँग्रेस व भाजपाच्या पदाधिकाºयांमध्ये जोरदार शाब्दीक चकमक झाली. पुढे संतप्त शेतकºयांनी पालकमंत्री दादा भुसे व जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांनाही घेराव घालत जाब विचारला. राज्य शासनाने दिवाळीपूर्वी कर्जमाफी करू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर मंगळवारी  सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून जिल्ह्यातील निवडक शेतकºयांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी निमंत्रित करा, असे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर सायंकाळी उशिरापर्यंत नियोजन करून जिल्ह्यातील ४० शेतकºयांना निमंत्रिथ करण्यात आले होते. सभागृहाबाहेर शेतकरी संतप्त कार्यक्रम आटोपल्यानंतर सभागृृहाबाहेर पडताच धुळे तालुक्यातील धामणगाव येथील नंदलाल पोपट पाटील, राजेंद्र पाटील, निर्मला पवार, कल्पना पाटील यांच्यासह अन्य शेतकºयांनी संताप व्यक्त केला. यातील काही शेतकºयांनी आमदार कुणाल पाटील व कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्याकडेही त्यांची कैफियत मांडली. तेव्हा संतप्त शेतकºयांसमवेत आमदार पाटील, सनेर व कॉँग्रेसच्या अन्य  कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

 

प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यक्रमासाठी  ४० शेतकºयांना निमंत्रित करण्यात आले होते. परंतु, प्रमाणपत्र केवळ वीसच छापलेले होते. त्यामुळे कार्यक्रमात उर्वरीत शेतकºयांचा सत्कार करता आला नाही.     - दादा भुसे, पालकमंत्री