शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 :सोपविलेले काम जबाबदारीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 13:24 IST

जिल्हाधिकारी : प्रक्रियेसाठी नियुक्त समन्वय अधिकाऱ्यांना निर्देश

धुळे : राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला असून प्रत्येक समन्वयक अधिकाºयाने (नोडल आॅफिसर) दक्षता बाळगावी तसेच सोपविलेले काम जबाबदारीपूर्वक पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी येथे दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल, तहसीलदार सुचिता चव्हाण, स्थानिक लेखा निधी विभागाचे सहाय्यक संचालक बाबूलाल पाटील, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी भारत धिवरे आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवाजिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व समन्वयक अधिकाºयांंनी परिपूर्ण नियोजन करावे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. त्यासाठी शिक्षण विभागाने वेगवेगळे उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांची मदत घ्यादिव्यांग मतदारांची माहिती संकलित करुन त्यांना मतदानासाठी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट- गाइडच्या विद्यार्थ्यांची मदत घेऊन त्यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करावी. निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी, सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाºयांचे प्रशिक्षण, वाहतूक आराखडा, वाहनांची आवश्यकता यांचाही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आढावा घेतला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भामरे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला सर्व संबंधित अधिकाºयांसह कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी अनुषंगिक अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले.

 

टॅग्स :Dhuleधुळे