शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याविरुद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:35 IST

आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मनपा आयुक्तांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे जनतेला विविध प्रलोभने दाखवित आहेत़ त्यामुळे त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर आणि राष्टÑवादीचे अनिल मुंदडा यांनी शनिवारी लेखी स्वरुपात महापालिका निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे़ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे धुळे दौºयावर आले असता त्यांनी भारतीय जनता पार्टीला सत्ता द्या. मी मुख्यमंत्र्यांना तीनशे कोटी देण्यास भाग पाडेल, असे प्रलोभनात्मक वक्तव्य केले. तसेच निवडणुकीच्या काळात जो - जो मार्गात येईल त्यांच्या मुंडक्यावर पाय ठेवून पुढे जा आणि सत्ता मिळवा या वक्तव्यामुळे देखील सामाजिक तणाव निर्माण होण्यास कारणीभूत ठरणार आहे. वरील दोन्ही वक्तव्यांमुळे आदर्श आचार संहितेचा भंग झालेला आहे. याप्रकरणी चौकशी करुन रावसाहेब दानवे यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा  गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे.वरील तक्रार  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, राष्ट्रवादीचे अनिल मुंदडा यांनी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली          आहे़ तक्रारीची प्रत ही राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त यांच्याकडेही पाठविण्यात आली असल्याची माहिती सनेर आणि मुंदडा यांनी यावेळी दिली  आहे. मुख्यमंत्र्यांविरुद्धही तक्रार- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   यांच्या स्वत:च्या आवाजातील एक ध्वनीफित सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आली आहे. नाशिक व    धुळे महानगरपालिका  क्षेत्रात एम.एन.जी.एल. योजनेअंतर्गत            घराघरात स्वच्छ व सुरक्षित गॅस देऊ   अशी ध्वनीफित सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. सदर मजकूर     हा महानगरपालिका क्षेत्रातील    जनतेला प्रलोभन दाखविणारा  असल्यामुळे सदर ध्वनीफितीची    चौकशी करुन मुख्यमंत्री          यांच्याविरोधात आदर्श आचारसंहिता           भंग केल्यासंदर्भात गुन्हा दाखल    करण्यात यावा, अशी मागणी तक्रारीत केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे