शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : बैलगाडीवरुन साधला जनतेशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 23:26 IST

धुळे ग्रामीण। कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ पत्नी अश्विनी पाटील मंदानात

dधुळे : शेती आणि मातीशी नाते सांगत तालुक्यातील शेतकरी सन्मानाने जगला पाहिजे, बळीराजा समृद्ध झाला पाहिजे म्हणून आमदार कुणाल पाटील हे धुळे तालुक्यात काम करीत आहेत, असे सांगत अश्विनी पाटील ह्या तालुक्यातील महिलांशी थेट संवाद साधत आहेत. दरम्यान शेतकऱ्याचे जीवापाड प्रेम असणाºया बैलगाडीवर शिरधाणे गावापासून ते गुलाबवाडीपयत पाटील यांनी प्रवास करीत आपल्या परिवाराचे नाते मातीशी घट्ट असल्याचा संदेश त्यांनी ग्रामस्थांना करुन दिला.धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी नेहमीच तालुक्यातील सर्व सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांसाठी काम करीत असतात. त्यांच्या या राजकीय आणि सामाजिक प्रवासात त्यांच्या पत्नी अश्विनी पाटील ह्या नेहमीच पुढे असतात. दोन्हीही उच्च शिक्षित असले तरीही तालुक्यातील शेतकरी आणि मातीशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. गोरगरीब जनता आणि शेतकºयांच्या दैनंदिन जीवनाशी एकरुप होत अश्विनी पाटील ह्या सध्या धुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये महिला, शेतकरी आणि ग्रामस्थांच्या भेटी घेत आहेत. कधी पायी, ट्रॅक्टरवर तर कधी शेतकºयांचा जीवलग सखा बैलगाडीवरस्वार होत वाड्यावस्त्यावर पोहचत आहेत.त्यांनी धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात नुकतेच शिरधाणे प्र.नेर, खंडलाय, खु., बांबुर्ले, खंडलाय बु. तसेच मुकटी येथे जाऊन येथील ग्रामस्थ शेतकरी, महिला यांच्या भेटी घेतल्या. भेटी दरम्यान त्यांनी बैलगाडीवर बसून शिरधाणे प्र.नेर येथील गुलाबवाडीपर्यंत प्रवास केला. यावेळी अश्विनी पाटील यांनी महिला व शेतकºयांसह तरुण - तरुणी यांच्याशीही संवाद साधला तसेच त्यांच्याकडून परिसरातील अडीअडचणी जाणून घेतल्या.यावेळी त्यांच्यासोबत शिरधणे प्र.नेर येथील जनाबाई महाले, रेखाबाई भदाणे, सुशिलाबाई भदाणे, गिताबाई भदाणे, इंदूबाई भदाणे, देवकाबाई भदाणे, लताबाई भदाणे, वैशाली सोनवणे, पं.स.चे माजी सभापती दिनेश भदाणे, सरपंच जिभाऊ पाटील, उपसरपंच गोरख पाटील यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे