शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

धुळयातील १३६ कोटींच्या पाणी योजनेची आयुक्तांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 11:37 IST

आतापर्यंतच्या कामाचा आढावा, ४९ कोटीतून ५५ टक्के काम पूर्ण

ठळक मुद्दे-उपजलवाहिन्यांचे काम १९० किमी, मुख्य जलवाहिन्या ९ किमी पूर्ण -सद्यस्थितीत ७ जलकुंभांची कामे प्रगतिपथावर -पाणी योजनेच्या कामास ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात राबविण्यात येत असलेल्या १३६ कोटींच्या पाणी योजनेतील कामांची पाहणी मनपा आयुक्तांनी सोमवारी केली़ यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारीही उपस्थित होते़ पाणी योजनेचे आतापर्यंत ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे़महापालिकेच्या १३६ कोटी रूपयांच्या पाणी योजनेचे काम बºयाच गोंधळानंतर अखेर मार्गी लागले आहे़ मनपा आयुक्तांकडून या योजनेच्या कामाचा दर आठवड्याला शुक्रवारी आढावा घेतला जात असल्याने योजनेच्या कामाला गती मिळाली आहे़ दरम्यान, सोमवारी दुपारी साडेतीन वाजता मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पाणी योजनेच्या कामांची पाहणी केली़ यावेळी अभियंता कैलास शिंदे, चंद्रकांत उगले, मजीप्राचे उपअभियंता व्हीक़े़सूर्यवंशी, शाखा अभियंता एस़व्ही़वाणी, पी़बी़राठोड, ठेकेदाराचे प्रतिनिधी शिंदे उपस्थित होते़ आयुक्तांनी हनुमान टेकडी ते चक्करबर्डी जलवाहिनीसह मोहाडी, नगावबारी, वरखेडी येथे सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामांची पाहणी केली़ तसेच मजीप्राच्या कार्यालयात पाणी योजनेच्या कामाचा आराखडा तपासून आढावादेखील घेतला़ १३६ कोटींच्या पाणी योजनेत आतापर्यंत ४८़९८ कोटी रुपयांचे काम पूर्णत्वास आले आहे़ उर्वरित कामेदेखील वेगाने पूर्ण करावीत, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या़ तसेच मनपा अधिकाºयांनीही योजनेच्या कामात सहकार्य करण्याचे आदेशही त्यांनी दिले़ पाणी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील काम ५५ टक्के पूर्ण झाले असले तरी मनपाने दुसºया टप्प्यातील निधीची मागणी यापूर्वी केली आहे़ पाणी योजनेत सद्यस्थितीत उप जलवाहिन्या, मुख्य जलवाहिन्या व जलकुंभांची कामे प्रगतिपथावर आहेत़  शहरातील अनेक प्रभागात पाणी योजनेत पूर्ण झालेल्या जलवाहिन्यांचे लोकार्पण यापूर्वी करण्यात आले आहे़