आयुक्त अजीज शेख यांच्या बदलीचे वृत्त सोशल मीडियावर फिरू लागले आणि शहरात या बातमी मुळे वातावरण ढवळून निघाले़ अचानक निघालेल्या बदली आदेशामुळे सर्वांना धक्का बसला़ परंतु ही बदली नसून गेल्या आठवड्यात महानगर शिवसेनेतर्फे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भाजपच्या सत्तेच्या काळात झालेल्या प्रचंड भ्रष्टाचाराची पुराव्यासह तक्रार केल्यामुळे व या भ्रष्टाचारात आयुक्त कसे सहभागी आहेत हे लक्षात आणून दिल्यामुळे आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी झाली आहे़ भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विकासाचे रंजक स्वप्न दाखवून मिळवलेल्या सत्तेच्या काळात व आयुक्त अजीज शेख यांच्या संयुक्त युतीमुळे गेल्या अडीच वर्षात धुळे हे अतिशय बकाल शहरासारखे झाले़ कधीही भरून न येणारे नुकसान या भ्रष्टाचाºयांच्या काळात महानगराचे झाले आहे़ बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा, लेखा विभाग अश्या सर्वच विभागात प्रचंड अनागोंदी माजली असून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे़ या सर्व विभागांची विशेष चौकशी पथकांमार्फत करून सखोल चौकशी करावी अशी मागणी शिवसेना महानगरच्यावतीने केलेली आहे़
नगर विकास मंत्र्यांनी देखील यात विशेष पथका कडून चौकशीचे आश्वासन दिले आहे़ चौकशी होऊन जळगाव घरकुल घोटाळ्यासारखा घोटाळा धुळे मनपाचा उघडकीस येईल व अनेक पदाधिकारी ठेकेदार आणि मनपाचे अधिकारी तुरुंगाची हवा खातील यात कुठलीही शंका नाही़ त्यामुळे आयुक्त अजीज शेख यांची चौकशी होईपर्यंत कुठे दुसºया मनपात नियुक्ती देऊ नये अशी मागणी शिवसेनेच्या वतीने नगर विकास मंत्र्यांकडे करणार आहोत़
भ्रष्टाचारी दबावाला बळी न पडता या शहराला मूलभूत नागरी सुविधा कश्या देता येतील चांगले रस्ते, चांगल्या गटारी, कचरामुक्त शहर, वेळेवर पाणीपुरवठा अश्या सर्व नागरी सुविधा नागरिकांना कश्या पुरवता येतील याकडे नूतन आयुक्तांनी विशेष लक्ष घातले पाहिजे़ यासाठी शिवसेना नवीन आयुक्त देविदास टेकाळे यांना सर्वतोपरी मदतीचे जाहीर वचन देते आहे व धुळे महानगरात नूतन आयुक्तांचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख मनोज मोरे, प्रफ्फुल पाटील, विधानसभा संघटक डॉ़ सुशील महाजन, संघटक राजेश पटवारी, समन्वयक गुलाब माळी करीत आहे़