धुळे- शेतकरीहिताचा निर्णय घेत आडतशिवाय शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी करण्याच्या निर्णय प्रक्रियेस आजापासून बाजार समितीमध्ये सुरुवात झाली असून आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत सदर लिलाव प्रक्रिया पार पडली. शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकत असतांना आर्थिक फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांच्या घामाच्या दामाची रक्कम तत्काळ रोखीने अथवा आरटीजीएस,धनादेशाने मिळावी म्हणून आमदार पाटील यांच्या सूचनेनुसार धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, धुळे बाजार समितीत आमूलाग्र बदल घडविण्यासाठी नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचा प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता कांदा खरेदीही खुल्या पद्धतीने करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी हिताचे निर्णय व्हावेत म्हणून धान्य भुसार,कडधान्य, भुईमूग शेगा या शेतीमालाची अडत्यांशिवाय थेट शेतमाल खरेदी हा निर्णय घेण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी केल्या होत्या. त्यानुसार १३ सप्टेंबरपासून धुळे बाजार समितीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना अडत्यास दोन ते अडीच टक्के आडत द्यावी लागत होती. मात्र, या निर्णयामुळे ती आडत न देता बचत होणार आहे. आवक वाढून थेट खरेदीदारांमध्ये स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला जास्तीत जास्त भाव मिळणार आहे. या लिलाव प्रक्रियेत शेतकऱ्यांना फक्त हमाली व मापाईसाठी लागणारी रक्कमच अदा करावी लागणार आहे. यावेळी ज्येष्ठ नेते प्रमोद जैन यांनी मार्गदर्शन केले
यावेळी माजी सभापती गुलाबराव कोतेकर, प्रमोद जैन, रितेश पाटील, बाजीराव पाटील, भगवान गर्दे, डॉ.दरबारसिंग गिरासे, प्रा.शरद पाटील, महेश मिस्त्री, युवराज करनकाळ, रणजित भोसले, प्रशासक किरण पाटील, साबीर सेठ, झुलाल पाटील, दिनेश माळी, सुदर्शन पाटील, पंढरीनाथ पाटील, प्रा.डॉ.दत्ता परदेशी, आप्पा खताळ, विजय चिंचोले, दुध संघाचे चेअरमन वसंत पाटील, दिलीप शिंदे, बळिराम राठोड, प्रदीप देसले, एन.डी.पाटील, सोमनाथ पाटील, सचिव दिनकर पाटील, वाहतूक सेल अध्यक्ष रावसाहेब पाटील, माजी संचालक अर्जुन पाटील, आत्माराम पाटील, अरुण पाटील, माजी पं. स. सदस्य योगेश पाटील, दिनकर पाटील, एस. एम. पाटील, शशीकाका रवंदळे, काँग्रेस कार्याध्यक्ष अशोक सुडके, बापू खैरनार, विशाल सैंदाणे, आबा गर्दे, भटू चौधरी,चंद्राकांत पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, भोलेनाथ पाटील, संतोष राजपूत, भाऊसाहेब पाटील, युवक काँग्रेस माजी जिल्हा अध्यक्ष हर्षल साळुंखे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पंकज चव्हाण, अनिल पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव दिनकर पाटील यांनी केले तर आभार मुख्य प्रशासक रितेश पाटील यांनी मानले.