सरपंच सोनीबाई गंगाराम भिल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच अंकिता अंजनकुमार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गावातील ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी ग्रामविकास अधिकारी प्रवीण ठाकरे, ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य नवल पाटील, शरद माळी, सर्व ग्रामपंचायत सदस्य हिंमतराव वंजी चौधरी, उज्ज्वला भटू माळी, नीलेश राजेंद्र जैन, वैशाली विठोबा माळी, महेश राजेंद्र माळी, जितेंद्र बापू भिल, अक्काबाई चिंधा भिल, वंदनाबाई नवल पाटील, वैशाली प्रवीण पाटील, स्वप्निल सुरेश पाटील, आशाबाई आसाराम पाटील, हरीष सुभाष पाटील, महेश अरुण पाटील, अलकाबाई राजेंद्र भामरे, प्रवीण बन्सीलाल पाटील, संतोष पारधी, चुडामण पाटील, विश्वास देसले, प्राचार्य आर. ए. पाटील, मुख्याध्यापिका सुलक्षणा पाटील, प्रमोद पाटील, विठोबा माळी आदी ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर येथील सर्व शाळेच्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण केले.
कापडणे गावातील १० शाळांचे झेंडा चौकात सामूहिक ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:41 IST