शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंती कार्यक्रमात कायद्याचे पालन केल्यास सहकार्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 12:04 IST

धुळ्यात शांतता समितीची बैठक : अपर पोलीस अधीक्षक यांचा विश्वास

ठळक मुद्देशिवजयंतीच्या अनुषंगाने एलसीबीचे पथक सज्ज झाले आहे़हद्दपार केलेल्यांवर त्यांचा ‘वॉच’ राहणार आहे़त्या अनुषंगाने पथकाने नियोजन देखील केले आहे़ 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वांनी कायद्याचे पालन करावे़ शांततेत उत्सव साजरा करावा़ कोणत्याही प्रकारे शांतता बिघडवू देऊ नका अशा सूचना करत कायद्याचे पालन केल्यास पोलिसांकडून सहकार्य मिळेल असा विश्वास अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी बैठकीत व्यक्त केला़ सोमवारी साजरी होणाºया शिवजयंतीचे औचित्य साधून शहर वाहतूक शाखेच्या शेजारी असलेल्या हॉलमध्ये शांतता समितीची बैठक शनिवारी सायंकाळी घेण्यात आली़ त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अपर पोलीस अधीक्षक पानसरे बोलत होते़ व्यासपिठावर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, जिल्हा विशेष शाखेचे डी़ एस़ गवळी, शहर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, आझादनगरचे दत्ता पवार, शहर वाहतूक शाखेचे प्रकाश मुंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या सरिता भांड, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे जितेंद्र सपकाळ, मोहाडी पोलीस ठाण्याचे अभिषेक पाटील या अधिकाºयांसह मनोज मोरे, रामकृष्ण खलाणे, भिकन वराडे, संजय वाल्हे, रजनीश निंबाळकर, सुमीत पवार, मनोज वाल्हे, शव्वाल अन्सारी, अमोल सूर्यवंशी, उमेश चौधरी आदी उपस्थित होते़ पानसरे यांनी उपस्थितांना मौलिक सुचना केल्या़ डीजे वाद्याला बंदी असल्याने कोणीही त्याचा आग्रह करु नये़ अनधिकृत विषयाबाबत परवानगी कोणीही मागू नये़ सर्वांनी कायद्याचे पालन करत शांततेत उत्सव साजरा करावा़ कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी़ वेळेचे बंधन सर्वांनी पाळणे गरजेचे राहिल़ कायद्याची चौकट कोणीही ओलांडू नये अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या़ याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, मनोज मोरे, शव्वाल अन्सारी, रामकृष्ण खलाणे, भिकन वराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले़ प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन दिलीप गांगुर्डे यांनी केले़