धुळे : राज्यात सत्ता स्थापन् करण्यासाठी राष्टपदींनी महायुतीसह आघाडी सरकारला आंमत्रित केले होते़ मुदतीपूर्वी राष्ट्रवादी पक्षाला देखील सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागु करण्यात आले़ याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीकडून सत्ता स्थापनेसाठी दावा-प्रतिदावा केला जात आहे़भाजप सरकार सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होईलराज्यात राष्ट्रपती राजवट जरी लागु असले तरी पंधरा दिवसाच्या आत भाजप सरकार सत्ता स्थापन करण्यात निश्चित यशस्वी होईल़-डॉफ़ारूख शाह-आमदार, धुळे शहरराज्याला राष्ट्रपती राजवटलागणे हे दुदैवराज्यातील जनतेने अतिशय स्पष्ट बहुमत दिले असताना सरकार स्थापन होणे महत्वाचे होते, परंतु तसे न होणे हे दुर्देवी आहे़ त्यामुळे जनतेची गैरसोय होईल या स्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका आवश्यक असल्याने स्थिर सरकार मिळण्यासाठी सर्वच पक्षानी प्रयत्न करावे-जयकुमार रावलआमदार शिंदखेडाराष्ट्रवादीतर्फे भाजपसरकारच्या मनमानीचा निषेधभाजपाला कंटाळून शिवसेना सत्तेतून बाहेर पडली होती़ राष्ट्रवादी काँंग्रेस पक्षांनी शेतकऱ्यांचा हिताचा विचार करून शिवसेनेला पाठिबा दिला होता़ राज्यपालांनी घटनाबाह्य निर्णय घेऊन मुदतीच्या आत प्रस्ताव पाठविल्याने सत्ता स्थापन करण्यात अपयश आले़ मनमानी करणाºया सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत़-किरण शिंंदेजिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीभाजपाच्या स्वार्थी पणामुळे राष्ट्रपती लागवट लागूमोदीचे भाजपाचे सरकार स्वार्थी असल्याने राष्ट्रपती राजवट लागु होण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाला कमी वेळ दिला़ त्यामुळे सत्ता स्थापन करण्यात अपयश आले़ मात्र याचा काहीही उपयोग होणार नाही़ सत्ता ही भाजप विरहीतच असणार आहे़-युवराज करनकाळजिल्हाध्यक्ष काँग्रेसराज्यात महायुतीचे पुन्हासरकार स्थापन होईलभाजप सरकारला जनादेश मिळाला आहे़ त्यामुळे सत्ता देखील भाजपाची राहील़ दोन्ही पक्षांनी चर्चा करून सरकार स्थापन करावे अशी अपेक्षा-काशिराम पावराआमदार, शिरपूरभाजपाला राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घाई झाली होतीभाजपाला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घाई झाली होती़ त्यामुळे भाजपाला २३ तास तर भाजपाला ४८ तासांची वेळ दिली गेली होती़ त्यामुळे अल्पवेळेत शिवसेनेला सत्ता स्थापना करता येवू शकली नाही़ चुकीच्या पध्दतीने राजवट लागू करण्यात आल्याची माहिती ज्येष्ट कायदे तज्ञांनी देखील मान्य केले आहे़- हिलाल माळीशिवसेना, जिल्हाध्यक्षशिवसेनेच्या आठमुटे पणामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट योगराष्ट्रपती राजवट लागु होणे ही दु:खाची गोष्ट आहे़ महायुतीकडे संख्याबळ असतांनाही शिवसेनेच्या आडमुठेपणाने सत्ता स्थापन करता येवू शकली नाही़ निवडणूकीपूर्वी ज्यांना आपण शिव्या देते होतो़ त्याच्यासोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय चुकीचा आह़े-अनुप अग्रवालजिल्हाध्यक्ष भाजपा
राष्ट्रपती राजवटीनंतर सत्ता स्थापनेचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 12:02 IST