शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहरात महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांमध्ये जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 11:15 IST

धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; महादेव मंदिरांवर विद्युत रोषणाई 

ठळक मुद्दे शहरातील अनेक मंदिरांमध्ये  विद्युत रोषणाइमोगलाई परिसरातील महादेव मंदिरात दिवशी कावड यात्रा काढणारमहाआरतीचेही केले आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महाशिवरात्रीचा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपल्यामुळे शहरात सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील महादेव मंदिरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील अनेक मंदिरांमध्ये रविवारी विद्युत रोषणाई करण्यात आली. महाशिवरात्री निमित्ताने  मंगळवारी शहरातील  महादेव मंदिरांमध्ये भरगच्च धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. महाशिवरात्रीनिमित्त रविवारी सकाळी शहरातील फुलवाला चौक, जुना आग्रारोड, पाचकंदील परिसरात बेलाची पाने विक्रीसाठी विक्रेत्यांनी दुकाने लावली होती.  बेलाच्या पानांची विक्री ही २० ते २५ रुपयात १०१ पाने यापद्धतीने सुरू होती. अनेक भाविकांनी बेल खरेदीसाठी येथील विक्रेत्यांकडे गर्दी केली होती. तसेच जुने  धुळे, पंचवटी परिसर, पारोळा रोड, गल्ली क्रमांक ५, मिल परिसरातील महादेव मंदिरांमध्ये रंगरंगोटी व मंदिरात स्वच्छता करण्याचे काम सुरू रविवारी सकाळपासूनच सुरू होते. नागेश्वर महादेव मंदिरात महाआरतीशहरातील गल्ली क्रमांक ५ मधील नागेश्वर महादेव मंदिरात १३ रोजी सायंकाळी सात वाजता महाआरतीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री नागेश्वर ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे. मोगलाईतून निघणार कावड साक्रीरोडवरील मोगलाई परिसरातील महादेव मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीच्या दिवशी कावड यात्रा काढण्यात येणार आहे. महादेव मंदिर ते सिद्धेश्वर गणपती मंदिरापर्यंत ही कावड काढण्यात येईल. याप्रसंगी येथील महादेव मंदिरात सकाळी अभिषेक व पूजनाचा कार्यक्रम होईल. शिवध्वजारोहणाचा कार्यक्रम महाशिवरात्रीच्या निमित्ताने अशोक नगरातील ब्रम्हकुमारीज प्लॉट क्रमांक ३१ येथे शिव ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी आठ वाजता होईल, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे. बाळापूर येथे बारा तासांचे अखंड भजन महाशिवरात्रीनिमित्ताने धुळे तालुक्यातील बाळापूर येथील गुरूदत्त मंदिरात मंगळवारी सकाळी श्री सत्यसाई सेवा संघटनेच्या विद्यमाने बारा तासांच्या अखंड भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच याच दिवशी सायंकाळी सहा वाजता २१ ओंकार, वेद पठणही होणार आहे. या कार्यक्रमासाठी भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री सत्य साई सेवा संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश वाघ व विलास चव्हाण यांनी केले आहे.  

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्री