शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

चिंतामणी पतसंस्था चेअरमनला कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 17:45 IST

धुळे ग्राहक मंच : दंडही ठोठावला

ठळक मुद्देचिंतामणी पतसंस्थेच्या चेअरमनसह सरव्यवस्थापकाला शिक्षाठेवी परत देण्याचे आदेश देवूनही कार्यवाही केली नाहीदोन वर्षाच्या सश्रम कारावासासह ठोठावला दंड

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : ठेवीदारांची रक्कम व्याजासह परत करण्याचा आदेश ग्राहकमंचाने देवूनही रक्कम न दिल्याप्रकरणी चिंतामणी पतसंस्थेचे चेअरमन आऱ बी़ अग्रवाल आणि सरव्यवस्थापक अनिल मोहन अग्रवाल यांना २ वर्षाचा सश्रम कारावास सोमवारी ठोठावला़ हा निकाल धुळे ग्राहक मंचाच्या पिठाने दिला़ शहरातील चिंतामणी पतसंस्थेत २००३ पुर्वी ४ लाख ४० हजाराच्या ठेवी आणि पतसंस्थेच्या बचत खात्यात ५ हजार ९० रुपये अशी रक्कम ठेवली होती़ मुदत संपल्यानंतर ही रक्कम ठेवीदाराला परत मिळणे अपेक्षित होते़ परंतु रक्कम देण्यास असमर्थतता दर्शविण्यात आली होती़ वारंवार तगादा लावूनही रक्कम मिळत नसल्याने तक्रारदार संजय बाळकृष्ण खानकरी आणि घरातील इतरांनी धुळे ग्राहक मंचाकडे २००८ मध्ये तक्रार दाखल केली़ त्यानंतर ग्राहक मंचाने सन २००८ मध्ये ठेवीदारांची रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश पतसंस्थेचे चेअरमन व सरव्यवस्थापक यांना दिले होते. या निकालाच्या विरोधात आऱ बी़ अग्रवाल यांनी औरंगाबाद आणि दिल्लीपर्यंत दाद मागितली़ पण, त्याचा काही उपयोग झालेला नाही़  दरम्यान, आदेश देऊनही ठेवी परत मिळत नसल्याबद्दल ग्राहक मंचकडे ठेवीदारांनी तक्रार केली. त्यानुसार ठेवी परत करण्याचे आदेश देवूनही रक्कम दिली नाही़ आदेशाचे उल्लंघन केले म्हणून धुळे ग्राहक मंचाच्या व्हि़ व्हि़ दाणी आणि संजय जोशी यांच्या खंडपिठाने सोमवारी  शिक्षेचा निकाल दिला़ त्यानुसार, आऱ बी़ अग्रवाल आणि अनिल अग्रवाल यांना २ वर्षाचा सश्रम कारावास आणि १० हजाराचा दंड दिला आहे़ दंड न भरल्यास १ महिन्याची शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे़तक्रारदाराकडून अ‍ॅड़ प्रशांत खानकरी यांनी कामकाज पाहीले़ ठेवींची रक्कम व्याजासह आता सुमारे ९ लाख इतकी होत आहे़