लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : विज्ञान दिनानिमित्त का़ स़ वाणी स्मृती प्रतिष्ठाण संचलित रेऊ वाणी विज्ञान विहारात विज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते़ सप्ताहात विद्यार्थ्यांना विविध शास्त्रज्ञ, विज्ञान लेखक, तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले़सोमवारी पुण्याच्या विज्ञान वाहिनीचे डॉ़ शरद गोडसे यांनी तरंग या विषयावर मार्गदर्शन केले़ तसेच डॉ़ महेंद्र शिंदे यांनी पर्यावरण व विज्ञान झेप या विषयावर स्लाईड शो द्वारे नवनविन तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली़विज्ञान सप्ताहात विविध स्पर्धांचेही आयोजन केले होते़ त्यात कथाकथन, कक्तृत्व, पोस्टर, प्रकल्प स्पर्धा झाल्या़ सोमवारी प्रकल्प स्पर्धा पार पडली़ यात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेवून आपआपले वैज्ञानिक अविष्कार सादर केले़ विद्यार्थ्यांनी विज्ञानाची जोड देवून बहुउपयोगी उपकरणांची निर्मिती केली होती़विज्ञान प्रकल्प स्पर्धेत छोट्या गटात जयहिंद हायस्कूलचा आदित्य गणेश जाधव प्रथम, चावरा पब्लिक स्कूलची सिध्दी विनोद कांदेले द्वितीय तर मयूर हायस्कूलचा लोकेश देसले योन तृतीय क्रमांक पटकावला़ मोठ्या गटात न्यू सिटी हायस्कूलचा यश पंकज मांडरे प्रथम, जयहिंद इंग्लीश स्कूल रसिख अन्सारी द्वितीय तर त्याच शाळेची कानूप्रिया योगेश शिंदे हिने तृतीय क्रमांक पटकावला़हर्षल योगेश पाटील या विद्यार्थ्याने तयार केलेले वाफेवर चालणारे जहाज आकर्षण ठरले़
रेऊ वाणी विहारात बाल वैज्ञानिकांचा मेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 22:25 IST