चंद्रकांत सोनार।धुळे : बालकांचे हक्क सुरक्षित राहण्यासाठी कायदा करण्यात आला आहे़ त्यासाठी जिल्ह्यात बाल संरक्षण विभाग स्थापन केला आहे़ तरी देखील शहरात बालकांचे हक्क सुरक्षित नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे़बाल हक्क, सुरक्षिता सप्ताहनिमित्ताने मनपा शिक्षण मंडळाकडून पहिल्या दिवशी शहरातून विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढून प्रबोधन देखील करण्यात आले होते़ सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना बालहक्क, बालकांविरुद्ध अत्याचार याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे़ सप्ताहातून कायद्याची जनजागृती केली जात आहे़ तर सप्ताह दरम्यान ‘लोकमत’ने शहरातील झोपडपट्टी, विटाभट्टी, हॉटेल, चहा हॉटेल, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अशा सार्वजनिक स्थळी सर्वेक्षण केल़े़ या ठिकाणी बालकामगार, भिक मागणारे, बुटपॉलिश करणारे बालके आढळून आले.कायदाकडे दुर्लक्षबालमजुरांना कामावर ठेवणाऱ्या मालकाविरुद्ध कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे़ मात्र कायद्याबाबत प्रशासनाकडून पुरेशाप्रमाणात जनजागृती होत नसल्याने कायद्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे़ धुळे जिल्हा मध्यप्रदेश व गुजरात राज्याच्या सीमेवर असल्याने दुसºया राज्यातून बालमजूर कामासाठी आणले जातात़ त्यामुळे कायदा असून, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही़करमणुकीतून उदरनिर्वाहजिल्ह्यात १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा झाला़ याच दिवशी आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयासह महाराणा प्रताप पुतळ्याजवळ सहा बालक डोंबाºयाचा खेळ करून नागरिकांचा करमणूक करीत होते़ तर रस्त्यावर फिरत भिक मागत होते़अनेकांनी सोडले शिक्षणकुटुंबाची गरज भागविण्यासाठी मालेगावरोड, आग्रारोड, महात्मा गांधी पुतळा, बारापत्थर, फुलवाला चौक, गॅरेज, मंगल कार्यालय अशा ठिकाणी काही बालकामगार कामे करतांना आढळून आले़ शासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार २००५-०६ ते २०१८-१९ पर्यत बालकामगारांसाठी शासनाने २६ बालकामगारांच्या विशेष शाळा सुरू केल्या आहेत़ मात्र कुंटूबांची जबाबदारी सांभाळण्यासाठी अनेकांनी शाळा सोडलेली आहे़
बालहक्क कायदा केवळ कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 13:40 IST
बालहक्क दिवस : सप्ताहाव्दारे कायद्याची जनजागृती, मात्र शहरातील बालमजुरीकडे प्रशासनाची डोळेझाक
बालहक्क कायदा केवळ कागदावरच
ठळक मुद्देबालहक्का कायदा अंमलबजावणी होण्याची गरजकायदाकडे दुर्लक्ष२६ बालकामगारांच्या विशेष शाळाकारवाई करून गुन्हा दाखल करण्याची तरतूदकायद्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष