शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

थाळनेर येथे बालिकेची छेड काढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 13:46 IST

धुळे जिल्ह्यातील थाळनेर येथील घटना, पोलीस स्टेशनच्या काचा फोडल्या, कारवाईच्या आश्वासनानंतर जमाव पांगला 

ठळक मुद्देभारतीय सैन्य दलातील जवानाच्या मुलीची पोलिसाकडून छेड संतप्त ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनच्या काचा फोडल्या जमावासह बालिकेच्या आजीनेही छेड काढणाऱ्या पोलिसाला चोप दिला डीवायएसपीसह एसआरपीचे पथक दाखल, जमाव पांगविला 

आॅनलाईन लोकमतशिरपूर,जि.धुळे, दि.५ : तालुक्यातील थाळनेर येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने भारतीय सैन्य दलातील जवानाच्या १० वर्षीय बालिकेची छेड काढल्याच्या कारणावरून जमावाने त्या कर्मचाऱ्यास चांगलाच चोप दिला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी संबंधिक पोलीस कर्मचाऱ्यास चोप देऊन पोलीस ठाण्यावरही दगडफेक केली.  त्यात काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संतप्त जमाव पोलीस स्टेशनबाहेर ठाण मांडून बसला होता. डीवायएसपी संदीप गावीत,पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन  देऊन जमावाला शांत केले.  थाळनेर पोलीस स्टेशनचे वाहन चालक नासिर जाकीर पठाण याने गावात राहणाºया भारतीय सैन्य दलातील जवानाच्या १० वर्षीय मुलीची छेडखानी केली.  ही घटना सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत कळताच संतप्त ग्रामस्थ गोळा झाले. त्यांनी पोलीस स्टेशनच्या काचा फोडल्या. तर मुलीच्या आजीनेही संबंधित कर्मचाऱ्यास चोप दिला. जमाव पांगविण्यात आला असून एसआरपीची तुकडी दाखल झाली आहे. पोलीस स्टेशनला सरपंच प्रशांत पाटील, मुलीचे वडील, आजी, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, डीवायएसपी संदीप गावीत बसले असून पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे.