शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बालविवाहातून कन्यारत्नाची प्राप्ती शिरपूर येथील घटना; गुन्हा दाखल

By देवेंद्र पाठक | Updated: March 16, 2023 18:42 IST

 एका अल्पवयीन मुलीचा विवाह तिचे आईवडील व इतर नातेवाइकांनी लावून दिल्यानंतर ती गर्भवती झाली.

धुळे- एका अल्पवयीन मुलीचा विवाह तिचे आईवडील व इतर नातेवाइकांनी लावून दिल्यानंतर ती गर्भवती झाली. तिने कन्येला जन्म दिला. मात्र, बालविवाह करणे हे बेकायदेशीर असल्याचे माहीत असूनही लग्न लावून दिल्याप्रकरणी तिच्या पालकांसह पती व अन्य नातेवाइकांविरोधात शिरपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

शिरपूर तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या पीडित अल्पवयीन विवाहितेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार तिची आई, वडील, पती, सासू आणि अन्य नातेवाईक यांनी संगनमत करून धुळे तालुक्यात एका गावातील तरुणासोबत विवाह लावून देण्यात आला होता. सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शिरपूर येथे तिने कन्यारत्नाला जन्म दिला.

हा बालविवाह असल्याचे समोर आल्यानंतर पीडित मुलीने शिरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, संशयितांविरोधात भादंवि कलम ३७६ सह बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, १०, ११, १२ सह पोस्को अधिनियम ४, १७, प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास धुळे तालुका पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.