शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

बोकड विकल्याचे पैसे न दिल्याने मुलाने केला जन्मदात्याचा खून

By admin | Updated: September 12, 2016 19:13 IST

कड विक्रीचे पैसे घर खर्चास न दिल्याच्या वादावरून मुलाने बापाचा कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना घडल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन लोकमत 

धुळे, दि. १२ -  तालुक्यातील बोराडी येथे बोकड विक्रीचे पैसे घर खर्चास न दिल्याच्या वादावरून मुलाने बापाचा कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना घडल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. मारेकरी मुलास जेरबंद करण्यात आले असून त्यास १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

गुरुवारी रात्री १०़३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ दिनकर डेडा पावरा यास दारूचे व्यसन होते. तो काही कामधंदा करत नव्हता़ मुलांच्या कमाईवर दारू पिवून मजा मारत होता. राहुल दिनकर पावरा (२३) याने काही महिन्यांपासून २ बोकड पाळले होते, त्यांची निगराणी तो राखत होता़ जेणेकरून सदर बोकड बकरी ईदला (कुर्बानीला) अधिक भावाने विकले जातील म्हणून निगा राखत होता़ त्यापूर्वीच त्याचे वडील दिनकर डेडा पावरा (४५) यांनी एका खाटीक इसमाला २० हजार रूपये किंमतीत विकून देण्यापोटी १० हजार रूपये घेवून खाण्यापिण्यात पैसे उडवले. हे पैसे घर खर्चाला दिले नाहीत़ सर्व पैसे खर्च करून टाकलेत़ त्याचा राग येवून त्या दोघांमध्ये वाद झाला.

संतपाच्या भरात राहुलने जन्मदाता दिनकर पावरा याच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घालून जागीच ठार केले़ ही घटना मयताची पत्नी वनत्याबाई हिने घराबाहेर पडून बाजूला राहणारे त्यांचे जेठ दिलीप पावरा यास सांगितले. तोपर्यंत दिनकर हा खाटेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडून मरण पावला होता. त्यांच्या उजवा कान, गाल व गळ्यावर राहुलने कुऱ्हाडीने वार केल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

दीड तासात आरोपी अटक घटना घडताच मयताचा मारेकरी राहुल हा घराच्या मागील दरवाजाकडून गुपचुप निघून पसार झाला़ ही घटना गावपाटील सीताराम मनश्या पाटील यांना कळविण्यात आली़ आरोपी गावातच लपून बसला होता़ घटनेचे वृत्त कळताच सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख व पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून अवघ्या दीड तासाच्या आत लपलेला राहूल यास पावरा वाड्यातून जेरबंद केले़याबाबत सांगवी ग्रामीण पोलिस ठाण्यात मयताचा मोठा भाऊ दिलीप डेडा पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुतण्या राहुल दिनकर पावरा याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ त्यास शुक्रवारी रोजी शिरपूर कोर्टात हजर केले असता १२ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले आहेत.