शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी टोचले नगरसेवकांचे कान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:01 IST

मुंबईत विजयोत्सव : विकास न केल्यास मनपा बरखास्त करू

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका निवडणूकीत जनतेने भाजपला विजयाचा कौल दिला़ त्यामुळे जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठीस सर्व नगरसेवकांनी विकासावर भर द्यावा़ कामे होत नसल्याच्या तक्रारी आल्या तर मनपा बरखास्त करायलाही मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा देत मुख्यमंत्र्यांनी नवनियुक्त नगरसेवकांचे कान टोचले़मनपा निवडणूकीत भाजपने ५० जागा मिळवत प्रथमच स्पष्ट बहूमत मिळवले़ या ऐतिहासिक विजयानंतर सर्व नवनियुक्त नगरसेवकांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली़ यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो व पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, महानगरप्रमुख अनुप अग्रवाल उपस्थित होते़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवनियुक्त नगरसेवकांशी संवाद साधला़ ते म्हणाले की, आतापर्यंत अनेक नगरसेवक अनेकदा निवडून आले परंतु त्यांनी शहराचा कधीच विचार केला नाही, त्यामुळे शहर विकासात बरेच मागे राहिले़ परंतु आता विकासाची संधी सर्व सदस्यांना भाजपच्या माध्यमातून मिळाली आहे़ पण यापूर्वी चालले तसे पुढे चालणार नाही, तर प्रत्येक नगरसेवकाला प्रभागाचा विकास हा एकमेव अजेंडा ठेवावा लागेल़ शहर विकासात निधी कमी पडू देणार नाही़ पण निधी जर वाया गेला व तक्रारी आल्या तर प्रसंगी महापालिका बरखास्त करायलाही मागे-पुढे पाहणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला़ शहर हद्दवाढीमुळे नगरसेवकांची जबाबदारी वाढली असुन शहरातील कोणताच भाग अविकसित राहणार नाही, याकडे लक्ष ठेवावे़ कोणीही गुंडगिरीला थारा देऊ नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या व सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले़ केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील नवनियुक्त नगरसेवकांचे अभिनंदन केले़ मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाºयाची नंतर नगरसेवकांमध्ये चर्चा होती़ पहिल्या आठवड्यात १०० कोटी़़़शहर विकासासाठी पहिल्याच आठवड्यात १०० कोटी रूपयांचा निधी देणार आहे़ शहरातील सर्व प्राथमिक सुविधांचे प्रश्न त्यातून सोडविण्यात यावेत़ त्याचप्रमाणे शहराला पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असून त्यासाठी प्रस्तावित योजनेसाठी आवश्यक निधी तातडीने देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले़ 

टॅग्स :Dhuleधुळे