शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींचे ‘रेकॉर्ड’ तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 16:55 IST

शहर हद्दवाढीतील गावे : महापालिका व जिल्हा परिषदेकडून संयुक्त तपासणीची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहराची हद्दवाढ ५ जानेवारी २०१८ ला झाली होती़ त्याबाबतची अधिसूचना प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने लागलीच समाविष्ट झालेल्या गावांमधील ग्रामपंचायतींचे संपूर्ण रेकॉर्ड ताब्यात घेतले होते़ या ‘रेकॉर्ड’ची संयुक्त तपासणी आता महापालिका व जिल्हा परिषद करणार आहे़‘रेकॉर्ड’ केले होते ‘सील’शासनाच्या नगरविकास विभागाने ५ जानेवारीला काढलेल्या अधिसूचनेनुसार वलवाडी, भोकर, महिंदळे, नकाणे, अवधान, चितोड, नगाव, वरखेडी, बाळापूर, मोराणे, पिंपरी ही गावे महापालिका क्षेत्रात समाविष्ट झाली़ आधी शहराचे क्षेत्रफळ ४६़४६ चौकिमी इतके होते पण हद्दवाढीमुळे त्यात ५४़६२ चौकिमी इतकी भर पडल्याने शहराचे एकूण क्षेत्रफळ १०१़०८ चौकिमी इतके झाले आहे़ हद्दवाढीची अधिसूचना महापालिकेला प्राप्त होताच दुसºया दिवशी सर्व ग्रामपंचायतींचे ‘रेकॉर्ड’ महापालिकेने ताब्यात घेऊन ‘सील’ केले होते़ मनपा-जि़प़ संयुक्त बैठक७ फेब्रुवारी २०१८ ला महापालिका व जिल्हा परिषद प्रशासनाने पुढील कार्यवाहीसंदर्भात संयुक्त बैठक घेतली होती़ या बैठकीत, ग्रामपंचायत क्षेत्रात चौदावा वित्त आयोग, स्वच्छ भारत अभियान, दलित वस्ती सुधार योजना, रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा, रस्ते दिवाबत्ती देयके यांसह जलयुक्त शिवार योजना, आवास योजना या योजनांमधून सुरू असलेली कामे पूर्ण करावीत व त्याची माहिती मनपाला सादर करावी, मनपाकडून संबंधित कामांची तपासणी करून देयके करणे,  नरेगांतर्गच्या कामांबाबत जिल्हाधिकाºयांचे मार्गदर्शन मागवून पुढील कार्यवाही करणे, ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे सुरू किंवा प्रस्तावित असतील ती कामे कोणत्या गट क्रमांकात आहे, तो गट क्रमांक हद्दवाढीत समाविष्ट आहे का? हे तपासणे यांसह विविध सूचना देण्यात आल्या होत्या़ तरीही अभिलेख अपूर्णचत्यानंतरही काही ग्रामपंचायतींचे अभिलेख महापालिकेला प्राप्त झाले नसून काही अभिलेख अपूर्ण आहेत़ त्यामुळे तपासणी कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे़  मनपाला काही ग्रामपंचायतींच्या ‘रेकॉर्ड’मध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय आल्याने चौकशी सुरू करण्यात आली होती़ त्याबाबतचा अहवालही प्राप्त होण्याची शक्यता आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे