धुळे : जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी उशीरा पोहचलेल्या दोन सदस्यीय केंद्रीय पथकाने अल्पावधीत पाहणी आटोपली. दुपारी १२ वाजेपासून प्रतीक्षा करणाºया शेतकºयांशी संवाद साधला, मात्र शेतकºयांचे समाधान झाले नाही. केंद्रीय वित्त मंत्रालयाचे खर्चविषयक विभागाचे सल्लागार दिना नाथ आणि केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या जयपूर येथील प्रकल्पाचे संचालक डॉ. सुभाष चंद्र यांचा या पथकात समावेश होता. त्यांनी चार ऐवजी तीनच गावात जाऊन नुकसानाची पाहणी केली. नुकसान किती व कसे झाले ही प्रक्रिया त्यांनी समजून घेतली. मदतीबाबत त्यांनी कसलेही आश्वासन शेतकºयांना दिले नाही. मुकटी येथे संध्याकाळी पोहचलेल्या पथकाला मोबाईलच्या प्रकाशात पाहणी करावी लागली. कपाशीची बोंडे उमलून पाहिलीधुळे तालुक्यातील पुरमेपाडा येथे पोहचताच पथकाने सर्वप्रथम तेथील मोहन दशरथ पाटील यांच्या नुकसानग्रस्त कपाशी पिकाची पाहणी केली. पाटील यांनी १.८० हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड केली. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाचा पिकाला वाढ व फळधारणेसाठी फायदा झाला. मात्र आॅक्टोबर महिन्यात कापूस फुटण्याच्या बेतात असताना संततधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे पहिल्या एक ते दोन वेचण्यांचा चांगल्या दर्जाचा कापूस झटकला गेला. त्यामुळे सुमारे ५० टक्के नुकसान झाले. सध्या या कपाशीची पहिली वेचणी होणार आहे. ज्या कैºया झाडावर दिसतात, त्यातून कापूसच बाहेर पडणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.तेव्हा लगेच सदस्यांनी बोंड तोडून त्याबाबत खात्री केली. एरवी पहिल्या दोन वेचण्यात १५ ते २० क्विंटल कापूस होतो. परंतु यंदा आतापर्यंत जेमतेम तीन-चार क्विंटल कापूस गोळा झाल्याचे पाटील यांनी पथकातील सदस्यांना सांगितले. कणसांचेही केले निरीक्षण पुरमेपाडा येथेच असलेल्या दुसºया शेतातही सदस्य पोहचले. शेतकरी सयाजी श्रावण जाधव यांच्याकडून त्यांनी मका व बाजरीच्या नुकसानाची माहिती घेतली. रब्बी हंगामासाठी त्यांनी मक्याचे शेत तयार केले. परंतु पावसामुळे खराब झालेली बाजरी व कोंब फुटलेला मका यांची कणसे जाधव यांनी अधिकाºयांना दाखविली. बाजरी तर शेतातच पडून होती. सदस्यांनी कणसे उचलून त्यांचे निरीक्षण केले.नुकसानाबाबत शंका उपस्थितपथकातील सदस्य डॉ.सुभाष चंद्रा व दिना नाथ यांनी नुकसान का व कसे झाले, याबद्दल संबंधित शेतकºयांशी सविस्तर बोलून माहिती घेतली. प्रामुख्याने नुकसान काय झाले, याबद्दल त्यांनी शंकाही उपस्थित केल्या. त्या निवारताना महसूल व कृषी विभागांच्या अधिकाºयांची काही वेळा गोचीही झाली. मात्र सदस्यांनी शंकांचे निरसन करूनच घेतले. या भागातील प्रमुख पीक कोणते, कधी लागवड केली, पाऊस कसा झाला, संततधार पाऊस व अतिवृष्टीवेळी पीक कोणत्या टप्प्यात होते, याबद्दल त्यांनी शेतकºयांना तसेच अधिकाºयांना अनेक प्रश्नही विचारले. कृषी विभागातर्फे शेतांची निवडनुकसानाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार असल्याने त्यासाठी योग्य शेतांची निवड कृषी विभागाकडून करण्यात आली होती. पावसाने उघडीप देताच पंचनाम्याचे बहुतांश कामही आटोपले आहे. त्यामुळे शेतकºयांनी रब्बी पिकांच्या लागवडीसाठी खराब झालेली पिके शेताबाहेर काढून तसेच जाळून नष्ट केली आहेत. त्यामुळे कृषी विभागाने स्थानिक कृषी अधिकारी, कर्मचाºयांची मदत घेऊन पथकाला नुकसानाची वास्तव स्थिती लक्षात आणून देण्यासाठी तालुक्यातील विविध शिवारांमधील शेतांची निवड केली होती. धुळे तालुक्यातील पुरमेपाडा, आर्वी व मुकटी या चार गावांच्या शिवारात ही पाहणी करण्यात आली. वेळेअभावी अजंग येथील पाहणी रद्द करून त्या पुढील मुकटी शिवारात कांदा व बाजरी पिकांच्या नुकसानाची माहिती घेतली. तोपर्यंत अंधार झाला होता. त्यामुळे तेथे मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात सदस्यांनी प्रत्यक्ष शेतात पाहणी करून शेतकरी रूकमाबाई बडगुजर व दत्तात्रय बडगुजर या शेतकºयांकडून अनुक्रमे बाजरी व कांदा पिकाच्या नुकसानाबाबत माहिती घेतली. तोपर्यंत चांगलाच अंधार झाला होता. त्यामुळे पथकाने दौरा आटोपून जळगावकडे मार्गस्थ झाले.भाषेमुळे अडचणकेंद्रीय पथकाचे सदस्य हे हिंदी भाषिक असल्याने संवादावेळी अनेकदा अडचण निर्माण झाली. परंतु विभागीय आयुक्त राजाराम माने व जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी त्यांना हिंदी तसेच प्रामुख्याने इंग्रजी संभाषणातून नुकसानाचे स्वरूप व स्थिती व्यवस्थित विशद करून सांगितली. त्यामुळे नेमके नुकसान काय व कसे झाले, याचे आकलन पथकाच्या सदस्यांना झाले. त्या नंतर त्यांनी शंकानिवारणासाठी पुन्हा काही प्रश्न शेतकºयांना विचारले. त्यांनी घेतलेल्या माहितीच्या सविस्तर नोंदीही आपल्या डायरीत करून घेतल्या. संततधार पावसाने बाजरीची कणसे कुजलीधुळे तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी घरात खाण्यासाठी बाजरीची लागवड करतात. परंतु यंदा पावसाने त्यांच्या तोंडाचा घास हिरावला. पुरमेपाडा, आर्वी, अजंग, मुकटी आदी परिसरात त्याचा प्रत्यय आला. कापलेली बाजरी पाऊस सुरू झाल्याने शेतातच राहिली.त्यामुळे कणसे जागीच कुजून गेल्याचे या दौºयात दिसून आले. त्यामुळे यंदा खाणार काय, अशी चिंंता शेतकºयांना सतावत आहे. तसे त्यांनी पथकाच्या सदस्यांनाही सांगितले. संततधार पाऊस सुरू राहिल्याने कांद्याचे पोषण झालेच नाहीजिल्ह्यात खरीप कांदा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. परंतु यंदा संततधार पाऊस, अतिवृष्टी व अवकाळी पाऊस यामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. त्यामुळे कांद्याचे नीट पोषण झाले नाही. ही प्रक्रिया होणार त्याचवेळी पाऊस झाल्याने कांद्याचे कुपोषण झाले. त्यामुळे त्याला चांगला भाव मिळाला नाही. बहुतांश शेतकºयांना तर काहीच उत्पन्न झाले नाही. कांदा पोसला न गेल्याने त्याला वजन, रंगरूप व दर्जेदारपणा लाभला नाही. परिणामी यावर्षी कांद्यापासून शेतकºयांना काहीच उत्पन्न मिळाले नाही, असे रूकमाबाई यांनी अधिकाºयांना सांगितले. एकंदर त्यांनी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकºयांची प्रातिनिधिक कैफीयत पथकाच्या सदस्यांना ऐकविली. सरकारने लवकरच नुकसान भरपाईसाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी या वेळी पथकाकडे केली. शेतात जाणारा रस्ता खचल्याने हाल या दौºयास प्रारंभ झाला त्या पुरमेपाडा येथे कपाशीच्या नुकसानाची माहिती घेतल्यानंतर पथकाचे सदस्य, मका, बाजरीच्या नुकसानाची पाहणीसाठी अधिकारी त्याच शिवारात पुढे गेले. तेथे शेतात जाणारा रस्ता खचल्याचे लक्षात आले. त्यामुळे सर्वच वाहनांच्या चालकांना मोठी कसरत करावी लागली. रस्त्यावरील माती वाहून गेली असून त्याखालील मोठे व टोकदार दगड अक्षरश: उघडे पडले असून शेतकºयांनी त्याकडे लक्ष वेधले.
अवघ्या तासाभरात केली नुकसानाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:07 IST