शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानदार व तक्रारदारात जुंपली

By admin | Updated: January 10, 2017 23:55 IST

कापडणे : येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी सकाळी दहा वाजता ग्राहक तक्रार निवारण विशेष सभा घेण्यात आली.

कापडणे : येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी सकाळी दहा वाजता ग्राहक तक्रार निवारण विशेष सभा घेण्यात आली. ही सभा स्वस्त धान्य दुकानदार व तक्रारदार ग्राहकांच्या वादात चांगलीच गाजली. अखेर तंटामुक्ती अध्यक्षांनी मध्यस्थी करुन वाद मिटविला.कापडणे येथे ग्राहक तक्रार निवारण विशेष सभा राजेंद्र साहेबराव पाटील अध्यक्षस्थानी होते. सभेत तलाठी विजय पुंडलिक बेहरे यांनी ग्राहक तक्रारदारांच्या समस्यांचा पाढा ऐकून संबंधित रेशन दुकान चालकांद्वारे समस्यांचे निराकरण करण्यात यावे, असे सांगितले.या सभेत ग्राहकांनी काही रेशन दुकानदारांकडून बेजबाबदारपणा, उर्मट व अरेरावीपणाची वागणूक मिळत असल्याचा आरोप ग्रामदक्षता समितीसमोर केला. तसेच ग्राहकांना माल घेतल्याच्या पावत्या रेशन दुकानदारांकडून दिल्या जात नाही, असे सांगून रेशन दुकानात ग्रामदक्षता समितीसमोरच ट्रकमधून माल उतरविण्यात यावा. ग्रामदक्षता समिती सदस्ये व अध्यक्षांचे भ्रमणध्वनी क्रमांक व त्यांच्या नावाचे फलक दुकानात कोणीच लावलेले नाहीत. दुकानात स्वस्त धान्याचा दर फलक कायमस्वरूपी लिहिलेला दिसत नाही. दुकानात धान्यांचे नमुने बाटलीत भरून दर्शनी भागात ठेवले जात नाहीत, अशा विविध तक्रारींचा पाढा ग्रामस्थांनी मांडला. त्यावर तक्रारीसंदर्भात ग्रामदक्षता समितीचे सदस्य दुकानदारांना सूचना देण्यासाठी गेले. मात्र, एका दुकानदारानेही त्या सूचनांचे पालन केलेले दिसत नाही, असे तलाठी बेहेरे यांनी सांगितले. सभेत उपसरपंच प्रभाकर वसंत बोरसे, ग्रा.पं. सदस्य भटू विश्राम पाटील, प्रा.महेंद्र विक्रम भामरे, भटू गोरख पाटील, अमोल पाटील, राजेंद्र माळी, सुमित माळी, भैया बोरसे, भैया पाटील, मनोज पाटील, गुढ्ढा भिल, चंदुलाल भिल, मनोज पाटील, प्रमोद पाटील, पंकज पीतांबर पाटील, गुलाब पाटील, विश्वास आत्माराम देसले, गजेंद्र पीतांबर पाटील आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित      होते.वाद विकोपाला..कापडणे येथील ग्राहक तक्रार निवारण विशेष सभेत ग्राहक विजय माळी यांनी, आपल्यावर स्वस्त धान्य दुकान नं. 188 चे संचालक देवीदास पाटील हे अन्याय करीत आहेत, अशी कैफियत दक्षता समिती अध्यक्ष व सरपंच यांच्याकडे मांडली. त्यावरुन रेशन दुकानदार देवीदास पाटील व विजय माळी यांच्यात वाद विकोपाला जाऊन बाचाबाची झाली. अखेर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नवल नामदेव पाटील यांनी मध्यस्थी करुन सर्वाना शांत केले.