शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवशाही’साठी ‘परिवर्तन’च्या फेºया कमी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 12:01 IST

धुळे विभाग : प्रवाशांच्या सुविधेसाठी लवकरच धुळे-नाशिक मार्गावर वातानुकूलित ‘शिवशाही’ बस सुरू होणार

ठळक मुद्देधुळे आगारातर्फे मुंबई, पुणे शिवशाही बस सुरूप्रवाशांचा मिळतोय प्रतिसाद लवकरच धुळे-नाशिक शिवशाही बस सुरू होणार

अतुल जोशी ।आॅनलाईन लोकमतधुळे  :  महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) सुरू केलेली ‘शिवशाही’ बससेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे.  आता धुळे-नाशिक मार्गावर विनावाहक वातानुकूलित ‘शिवशाही’ बस सुरू करण्यात येणार आहे. मात्र हे करत असताना धुळे-नाशिक या विनावाहक  ‘परिवर्तन’ बसच्या फेºयांची संख्या थोडी कमी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.खासगी बससेवेला स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने विविध मार्गावर अत्याधुनिक अशी ‘शिवशाही’ बससेवा सुरू केली. वातानुकूलित बस, आकर्षक डिजिटल बोर्ड, पुशबॅक आरामदायी सीट, टू बाय टू आसन व्यवस्था, मोबाइल चार्जर, अशी या बसची वैशिट्ये आहेत. या बसची आसनक्षमता  ४३ आहे.सर्वप्रथम मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्गावर या बसेस सुरू झाल्या. तेथे प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यानंतर धुळे आगारातर्फेही धुळे-पुणे, धुळे-मुंबई या मार्गावर ‘शिवशाही’ बस सुरू करण्यात आली आहे.धुळे-नाशिक शिवशाही बससेवाप्रवाशांचा वाढता प्रतिसाद व उन्हाळ्यात वातानुकूलित बसची गरज लक्षात घेऊन, एसटी महामंडळाने आता धुळे-नाशिक या मार्गावर विनावाहक ‘शिवशाही’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.५ मार्चनंतर ही बससेवा सुरू होऊ शकते असे सांगण्यात आले. सकाळी ६ वाजता धुळे आगारातून पहिली बस सुटणार आहे. त्याचवेळेला नाशिकहूनही धुळ्यासाठी ही बस सुटेल. सायंकाळी ७.४५ वाजता दोन्ही दिशेने शेवटची शिवशाही बस सुटेल.  धुळे आगाराच्या १० व नाशिक आगाराच्या १० अशा दिवसभरात २० फेºया होणार आहेत. ही बस मालेगाव बायपासने जाईल. धुळ्याहून सुटलेली बस साधारणत: अडीच तासात नाशिकला पोहचणे अपेक्षित आहे. तेवढाच वेळ नाशिकहून धुळ्याला पोहचण्यासाठी लागणार आहे.यासाठी मोठ्या नागरिकांना २६४ रुपये तर लहान मुलांना १३७ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. या बसमध्ये अर्धे तिकिटाची सुविधा नाही. त्यामुळे ज्येष्ठांनाही प्रवास करायचा असल्यास तो पूर्ण तिकीट काढूनच करावा लागणार आहे.मुंबई-पुणे मार्गावर स्लीपर कोचसध्या मुंबई-पुणे मार्गावर धावणाºया खासगी बसेस या स्लीपर कोच आहेत. त्यामुळे प्रवाशांचा त्या बसने प्रवास करण्याकडे जास्त कल आहे. खासगी बसच्या धर्तीवरच आता धुळे आगारातून मुंबई, पुणेसाठी ‘शिवशाही’ बसची स्लीपर कोचची सेवाही लवकरच सुरू होणार आहे.  तसेच धुळ्याप्रमाणे विभागातील इतर आगारांनाही ‘शिवशाही’ बस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.प्रवाशांनी लाभ घ्यावा : देवरे प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक, वातानुकूलित धुळे-नाशिक शिवशाही बससेवा सुरू करण्यात येत असून, त्याचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी केले आहे.