शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 12:07 IST

सतर्क राहण्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन..

धुळे : पुढचे २४ तास विशेषत: संध्याकाळी व रात्रीच्या वेळी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही, या कालावधीत कोणीही घराबाहेर पडू नये, जुने घर कच्चे घर किंवा घर पडण्याचा धोका असलेल्या नागरिकनी ग्रामसेवक किंवा नगरपालिकेशी संपर्क साधून तात्काळ समाज मंदिरात, शाळेत किंवा इतर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. पाळीव प्राण्यांना, गुराढोरांना झाडाखाली किंवा खांबाला बांधू नये त्यांना सुरक्षित ठिकाण उपल्ब्ध करावे, रात्रीच्यावेळी वादळामुळे घरावरील पत्रे पडून किंवा उडून जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे झाडे कोसळण्याची तुटण्याची शक्यता लक्षात घेता सतत सावध असावे, अतिवृष्टीमुळे छोट्यामोठ्या नाल्यांना पयार्याने नदीस पूर येण्याची शक्यता असल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचा सूचना देण्यात आलेल्या आहेत.नदी लाल रेषा पत्रालगत सखल भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, प्रत्येक तालुकानिहाय नियंत्रण कक्ष 24 तास सुरू ठेवण्यात आला आहे, सर्व अधिकारी व कर्मचारी हे मुख्यालयीच थांबतील, नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून दुपारी १२ नंतर घराच्या बाहेर पडू नये, बाजारातील गर्दी टाळण्यासाठी दुपारी २ नंतर सर्व दुकाने, शॉपिंग मार्केट बंद ठेवण्याचे आवाहनास प्रतिसाद देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, झाडाजवळ किंवा विजेच्या खांबाजवळ थांबू नका, आपली वाहने झाडाखाली लावू नका, स्वत:जवळ पिण्याचे पाणी, औषधे, काडीपेटी, दिवा असे साहित्य जवळ बाळगा, घराजवळ पत्रा किंवा तत्सम टोकदार वस्तू असणार नाही याची दक्षता घ्या, तुटलेल्या काचेच्या खिडक्यांपासून दूर राहा, संकटाच्यावेळी ग्रामसेवक, तलाठी, गटविकास अधिकारी किंवा तहासिलदारांशी संपर्क साधा, वीज पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने मोबाईल टॉर्च व इतर उजेड देणा?्या वस्तू हाताशी ठेवा, पूर आल्यास दुर्घटना घडल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनास कळवा अशी घटना पाहन्यासाठी गर्दी करू नका, एकमेकांना सहकार्य करन माणुसकी व भूतदया दाखवा, नदी, नाले यापासून दूर राहा, घाबरू नका, दक्षता घ्या. अफवा पसरवू नका अफवांवर विश्वास ठेवू नका असे जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे