शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महापालिकेच्या निवडणुकीला न्यायालयात आव्हान देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 15:20 IST

आमदार अनिल गोटे यांचा इशारा

ठळक मुद्देआमदार गोटे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवादमतदानात हेराफेरी झाल्याचा आरोपकार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना

आॅनलाइन लोकमतधुळे : महापालिका निवडणुकीच्या निकालात मोठ्या प्रमाणात हेराफेरी झालेली आहे. त्यामुळे हा आपला पराभव नाही तर ईव्हीएम मशीनचा विजय आहे. महापालिकेच्या निवडणुकीला न्यायालयात आव्हान देणार असून, वर्षभरातच पुन्हा महापालिकेची निवडणूक लढवायची असल्याने, कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे असा सल्ला आमदार अनिल गोटे यांनी दिला. महापालिका निवडणुकीत लोकसंग्राम पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. या पार्श्वभूमिवर लोकसंग्राम पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन व आगामी भूमिका स्पष्ट करण्यासाठी आमदार अनिल गोटे यांनी आज पक्षाच्या पदाधिकाºयांशी संवाद साधला. कामगार कल्याण भवन येथे हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर तेजस गोटे, देवराम पाटील, संजय बगदे, आदी उपस्थित होते. आमदार गोटे यांनी भाजपाचे नाव न घेता पक्षावर टीका केली. ते म्हणाले त्यांना मिळालेले यश हे कलंकीत आहे. आपला विजय झालाच कसा असे त्यांच्याच उमेदवारांनाही प्रश्न पडला आहे. त्यांना मते मिळाली नसून मते मिळवून घेतली आहे. मतदानाच्या शेवटच्या क्षणात केवळ पैसे दिले गेले नाहीत तर पैसे फेकण्यात आले असाही आरोप त्यांनी केला. दरम्यान निवडणुकीसंदर्भात काही प्रख्यात वकीलांशी बोलणी झालेली आहे. निवडणुकीला न्यायालयात आव्हान देणार असून, वर्षभरातच पुन्हा महापालिकेची निवडणूक लढवायची आहे. यावेळी ज्यांना उमेदवारी दिली, त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे असा सल्लाही त्यांनी दिला.  दरम्यान एक रूपयाही खर्च न करता, मतदारांनी लोकसंग्रामला दुसºया क्रमांकाची मते दिल्याबद्दल त्यांनी मतदारांचेही आभार मानले.  

टॅग्स :Dhuleधुळे