शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील केंद्र संचालक, पर्यवेक्षिकेला निलंबित करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:02 IST

सहा केंद्राचे केंद्रसंचालक बदलविले

ठळक मुद्देजिल्ह्यात प्रथमच केंद्रसंचालक, पर्यवेक्षिकेवर कारवाईशिक्षण क्षेत्रात उडाली खळबळसहा केंद्रावरील केंद्रसंचालकही बदलविले

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बारावीच्या हिंदी पेपराच्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी  उर्दू हायस्कुल केंद्रावर एका विद्यार्थ्यास कॉपी करतांना रंगेहात पकडले. दरम्यान या केंद्राचे केंद्र संचालक व पर्यवेक्षिकेला निलंबित करण्याचे आदेश सीईओंनी दिल्याची  माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांनी दिली. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील सहा केंद्रावरील केंद्र संचालकांनाही बदलविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ४४ केंद्रावर २५ हजर ८५५ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. यावर्षी कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी परीक्षा मंडळाबरोबरच प्रशासनानेही कडक पाऊले उचलली आहेत. बारावीचा  गुरूवारी हिंदीचा पेपर होता. पेपर सुरू असतांनाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी दुपारी धुळ्यातील नॅशनल उर्दू हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या केंद्राला अचानक भेट दिली. त्यांनी केवळ भेटच दिली नाही तर कॉपी करणाºया विद्यार्थ्याला रंगेहात पकडत शिक्षकांच्या स्वाधीन केले.पर्यवेक्षिका, केंद्रसंचालकावर निलंबनाची कारवाईदरम्यान या केंद्राच्या पर्यवेक्षिका शबाना बिलाल अहमद व केंद्र संचालक इक्बाल अहमद मोहंमद नजीर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी असे आदेश शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना दिले. जिल्ह्यात अशाप्रकारे पहिल्यांदाच कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान जिल्ह्यात हिंदीच्या पेपरला एकच कॉपी केस झालेली आहे. उर्वरित ठिकाणी हिंदीचा पेपर सुरळीत पार पडल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात आली.सहा केंद्रावरील केंद्र संचालक बदलविलेजिल्ह्यात असलेल्या उपद्रवी केंद्रावरील केंद्र संचालक  तत्काळ बदला असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी माध्यमिक शिक्षण विभागाला दिले. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने गुरूवारी रात्रीच सहा केंद्र संचालकांना बदलवून त्यांच्या जागी नवीन केंद्र संचालक नियुक्त केले. हे केंद्र संचालक शुक्रवारी त्या-त्या केंद्रावर हजर झाले होते.