शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

काजवे पुलाच्या मजबुतीसाठी स्तंभाजवळ सिमेंट क्रॉँक्रिटीकरण, डांबरीकरण करावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 23:22 IST

पुरामुळे पुलाचे नुकसान  : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे महानगरपालिकेला पाहणी अहवाल केला सादर

धुळे : पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे काजवे पुलाच्या (लहान पूल)  स्तंभाच्या मजबुतीसाठी चारही बाजुने क्रॉकीटीकरण करावे लागणार. तसेच पुलावरील संपूर्ण डांबरीकरण काढून नव्याने डांबरीकरण करावे लागणार असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने महानगरपालिकेला सादर केला आहे. या पुलाची दुरूस्ती केव्हा होणार याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागलेले आहे. शहरातून देवपूर भागात जाण्यासाठी पांझरा नदीवर १९६५ मध्ये लहान पूल बांधण्यात आला. यालाच काजवे पूल म्हणतात.  या पुलाचे स्तंभाचे बांधकाम हे दगडात झालेले आहे. या पुलावरून वाहनांची रात्री उशिरापर्यंत वर्दळ सुरू असते. दरम्यान ४ व ९ आॅगस्टला पांझरा नदीला आलेल्या महापुराचा फटका या लहान पुलाला बसला आहे. पुराचे पाणी पुलावरून गेल्याने, डांबरीकरण उखडलेले आहे. तसेच पुलाच्या स्लॅबच्या सळया उघड्या पडलेल्या आहेत. दरम्यान पुराच्या पाण्यामुळे पुलाच्या स्तंभाचे पायाजवळील रेती वाहून गेली. त्यामुळे काही ठिकाणी स्तंभ उघडे पडले, त्यांना तडा गेला आहे.  पुरामुळे पुलाचे नुकसान झाल्याने, या पुलावरून बसवाहतूक गेल्या १५ दिवसांपासून बंद करण्यात आली असून, आता फक्त लहान वाहनांचीच या पुलावरून वाहतूक सुरू आहे. हा पूल महानगरपालिकेच्या ताब्यात आहे.  या पुलाची पहाणी करून अहवाल द्यावा अशी विनंती महानगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला केली होती. त्यानुसार या पुलाची कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, उपअभियंता एजाज शहा, यांच्या सह या विभागाच्या अभियंत्यांनीही पुलाची पहाणी करून अहवाल तयार केला. पुरामुळे  स्तंभाजवळील रेती वाहनू गेल्याने ते  उघडे पडले आहेत. पुलाच्या मजबुतीसाठी  त्याच्या चारही बाजुला क्रॉक्रीटीकरण करावे लागणार आहे.  तसेच पुलाच्या स्लॅबच्या सळया उघड्या पडल्या असून, त्याठिकाणी गनायटींग करणे गरजेचे आहे. तसेच आतापर्यंत या पुलावर डांबरीकरणाचे थरावर थर देण्यात आल्याने, पुलावरील लोडही वाढलेला आहे.  त्यामुळे पुलावरील सर्व डांबरीकरणाचे थर काढून टाकून फक्त चार सेंटीमीटरचे डांबरीकरण करणे गरजेचे असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे महानगरपालिकेला सोपविण्यात आलेला असल्याचे अभियंता ए.बी.पाटील यांनी सांगितले.  दुरूस्तीनंतर या पुलाचे आयुष्य आणखी दहा वर्षांनी वाढणार आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे