निजामपूर - भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील पेशवेकालीन श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात कोरोनाच्या नवीन नियमांचे पालन करून १० दिवसीय गणेशोत्सवास सुरुवात झाली आहे. हा उत्सव आनंत चतुर्दशीपर्यंत साजरा होतो.
मंदिरात गणरायाची पेशवेकालीन पुरातन तेजःपुंज मूर्ती विराजित आहे. मंदिराचा जीर्णोद्धार होऊन भव्य मंदिर निर्माण झाले आहे. वर्षभर रोज सकाळी आणि सायंकाळी नित्यनियमाने पूजा, आरती होते. दरवर्षी गणेशोत्सवकाळात मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते; पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आल्यामुळे सर्व नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. मंदिरात व बाहेर रोषणाई करण्यात आली आहे. दररोज नित्य नवी आरास होणार असल्याचे संयोजक राजेंद्र बिहारीलाल शाह यांनी नमूद केले आहे .रोज सकाळी आणि सायंकाळी पूजा, आरती नित्यनियमाने होणार आहे. मात्र भाविकांना मंदिरात गर्दी करता येणार नाही असे संयोजकांनी स्पष्ट केले आहे.