या कार्यक्रमासाठी विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे येथील अर्धमागधी भाषेचे प्रा.प्रा. बाळासाहेब गणपाटील हे प्रमुख पाहुणे, तर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख पाहुणे प्रा. बाळासाहेब गणपाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापनेविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या जीवनातील राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांच्या अंगी चांगले गुण, सवयी कशा प्रकारे रुजतात? स्वयंसेवकांचे व्यक्तिमत्त्व कसे फुलते, याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.
डॉ. चिंतामणी देवकर यांनी विद्यार्थ्यांना जीवनात प्राप्त स्थितीत विद्यार्थी जीवन, राष्ट्रीय सेवा योजना व सामाजिक परिस्थिती यांची सांगड कशी घालावी, याविषयी मौलिक मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनील पाटील यांनी प्रास्ताविक व
सूत्रसंचालन केले, तर कार्यक्रम अधिकारी प्रा. विपुल वसावे यांनी आभार मानले.