शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात २८ लाखांचे जनावरांचे मांस पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 15:57 IST

कारवाई : बेकायदा सुरु होता कत्तलखाना

ठळक मुद्देचाळीसगाव रोड पोलिसांची कारवाईट्रक, टेम्पोसह २८ लाख ७५ हजाराचे मांस जप्तमालेगावच्या एकाविरुध्द धुळ्यात गुन्ह्याची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चाळीसगाव रोडवरील चौफुलीजवळ सुरु असलेल्या बेकायदेशीर कत्तलखाना पोलिसांनी उघडकीस आणला़ याठिकाणी छापा टाकत गो-मांस यासह ट्रक, टेम्पो असा एकूण २८ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई गुरुवारी करण्यात आली़ याप्रकरणी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़ शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीजवळ असलेल्या साई किनारा लॉजच्या बाजुला जैद साबिर भंगारवाला याच्या गोडावूनमध्ये बेकायदा कत्तलखाना सुरु असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलिसांना मिळाली़ माहिती मिळताच गुरुवारी सकाळी ११ ते साडे अकरा वाजेच्या सुमारास छापा टाकण्यात आला़ यावेळी त्या ठिकाणी जनावरांचे मांस आढळून आले़ १४० प्लॅस्टिक ड्रममध्ये हे मांस भरुन एमएच ०४ सीए ७१० आणि पिकअप व्हॅन एमएच ४१ जी २४१२ या वाहनातून घेवून जाण्याच्या तयारीत असल्याचे आढळून आले़ पोलिसांनी वाहनांसह मांस, इलेक्ट्रिक काटा, ड्रम, कोयता, कुºहाड असा एकूण २८ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ जप्त केलेल्या मांसाची विल्हेवाट वरखेडी रोडवर लावण्यात आली़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी जोऐब रऊफ पठाण यांनी गुरुवारी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार मालेगाव येथील कुरेशी शफीक अहमद खलील अहमद (२४) याच्याविरुध्द भादंवि कलम ४२९, ३६९, २७८ आणि महाराष्ट्र प्राणी अधिनियमानुसार संशयावरुन गुन्हा दाखल करण्यात आला़ सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आहेर तपास करीत आहे़