शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सुटय़ा एक रुपयासाठी वाहकाने वृद्धाला उतरवले

By admin | Updated: February 16, 2017 00:27 IST

एक रुपया सुटा नसल्याने एका वृद्ध प्रवाशाला एसटीच्या वाहकाने भररस्त्यात उतरवून दिल्याची संतापजनक घटना सोमवारी साक्री-निजामपूर दरम्यान घडल्याचे समोर आले आहे.

साक्री : भाडय़ासाठी फक्त एक रुपया सुटा नसल्याने एका वृद्ध प्रवाशाला एसटीच्या वाहकाने भररस्त्यात उतरवून दिल्याची संतापजनक घटना सोमवारी साक्री-निजामपूर दरम्यान घडल्याचे समोर आले आहे. सहप्रवाशांनी याबाबत राज्याच्या परिवहन मंत्र्यांकडे तक्रार केली. त्याची दखल घेत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. येथील बसस्थानकातून सोमवारी सकाळी 11 वाजता सटाणा आगाराची एमएच 40 वाय 5989 या क्रमांकाची  नाशिक-नंदुरबार बस निजामपूरला जाण्यासाठी मार्गस्थ झाली. एक वृद्ध शेतकरी निजामपूरला जाण्यासाठी या बसमध्ये बसले होते. तिकिटासाठी त्यांनी 100 रु.ची नोट दिली. निजामपूरचे भाडे 11 रुपये होते. त्यामुळे वाहकाने शेतक:याकडे वरचा सुटा एक रुपया मागितला. परंतु सुटा एक रुपया नाही, असे वाहकाला सांगितल्यावर वाहकाने येथून पाच कि.मी. अंतरावर बस थांबवून वृद्ध शेतक:यास खाली उतरवून दिले. यावेळी याच बसमधून प्रवास करणारे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक अविनाश सोनार यांनी वाहकाला याचा जाब विचारला. त्यांना वाहकाने उद्धट उत्तरे दिली. सोनार यांनी लगेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मंत्री रावते यांनीच कॉल रीसिव्ह केला. सोनार यांनी, शिवशाहीच्या नावाने सरकार आले. परंतु तुमच्या राज्यात वृद्ध शेतक:यावर अन्याय झाल्याचे त्यांना सांगितले. यावर एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तुमच्याशी बोलतील, असे सांगून फोन बंद केला. 10 मिनिटात एसटीचे व्यवस्थापकीय संचालक यांचा फोन येताच त्यांना सर्व प्रकार कथन केला. त्यावर वाहक  एस. बी. जोंधळे यांच्यावर चौकशीअंती कारवाईचे आश्वासन दिले.दोन दिवसांत काय कारवाई झाली, याबाबत सोनार यांनी सटाणा आगारप्रमुख के.आर. पाटील यांच्याशी संपर्क साधला. वरिष्ठ स्तरावरून कारवाईचे आदेश प्राप्त झाले असून तुम्ही लेखी तक्रार द्या, असे सांगण्यात आले.