शिंदखेडा : भुसावळकडून गुजरात राज्यातील बारडोलीकडे जात असतांना शिंदखेडा शहरापासून अवघ्या ४ किमी अंतरावर रेनॉल्ट कंपनीची डस्टर गाडीने अचानक पेट घेतला़ ही घटना २९ रोजी घडली़ यात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली असून या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. गाडीचे मात्र प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे२९ नोव्हेंबर दुपारी साडेतीन ते ४ वाजेच्या दरम्यान भुसावळ ते बारडोली जात असतांना शिंदखेडा शहरापासून ४ किमी अंतरावर शिंदखेडा विरदेल दरम्यान रस्त्यावर जीजे १९ एए ३९५६ क्रमांकाची आनंद हनुमंतभाई कनाडी यांच्या मालकीच्या गाडीने अचानक पेट घेतला़ रस्त्यावर धावत असलेली गाडी अचानक बंद पडल्याने चालक वसंत सुरेश पाटील हे गाडी खाली उतरून पाहिले असता गाडीचे इंजिनने पेट घेतल्याचे त्यांना दिसून आले़ प्रसंगावधान पाहून गाडीतील सर्व परिवाराला त्यांनी तात्काळ खाली उतरविले. घटनास्थळी येणाºया जाणाºया नागरीकांनी घटनास्थळी गर्दी केली होती़ तातडीने शिंदखेडा नगरपंचायतीच्या अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले़ अवघ्या काही क्षणात नगरपंचायतीचा बंब दाखल होऊन आग आटोक्यात आणली़ आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या बाबत शिंदखेडा पोलीस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली़ अग्नी उपद्रवची नोंद करण्यात आली आहे. घटना स्थळी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस कर्मचारी कैलास महाजन, ईश्वर कोळी दाखल झाले होते़
बारडोलीकडे जाणाऱ्या कारने शिंदखेडानजिक घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 21:38 IST