धुळे : कोरोनाच्या अनुषंगाने पोलिसांकडून खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या जात असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दुचाकी चोरीचा गुन्हा उघड केला आहे़ पिंपळनेर भागातून दुचाकी चोरल्यानंतर त्या धुळ्यात विक्रीसाठी आणल्या जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली़ त्यानुसार, भंगार बाजार भागात सापळा लावून एलसीबी पथकाने अण्णा श्रीराम गायकवाड (रा़ चिंचपाडा ता़ साक्री) याला संशयावरुन ताब्यात घेतले़ त्याच्याकडून २ लाख २० हजार रुपये किंमतीच्या ५ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत़ एलसीबीचे हनुमान उगले, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील, तुषार पारधी, अशोक पाटील, श्रीशैल जाधव, सागर शिर्के, दीपक पाटील यांनी ही कारवाई केली आहे़
२ लाखांच्यावर ५ दुचाकी हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:16 IST