शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बस कंटेनर अपघात जिवीतहानी टळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 12:13 IST

मुकटी शिवार : कंटेनर सोडून चालक फरार

ठळक मुद्देबस आणि कंटेनरचा अपघातधुळे तालुक्यातील मुकटी शिवारातील घटनासुदैवाने जिवीतहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दुचाकीला ओव्हरटेक करीत असताना भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने परिवहन महामंडळाच्या बसला मागून धडक दिली़ या अपघातात बसचा पत्रा कापला गेला़ सुदैवाने यात जिवीतहानी टळली़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेता कंटेनर सोडून चालक पळून गेला़ ही घटना धुळे तालुक्यातील मुकटी शिवारात गुरुवारी घडली़ तालुका पोलिसात नोंद करण्यात आली़ नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर धुळे तालुक्यातील मुकटी गावाच्या शिवारात पवार वर्कशॉप समोर अपघाताची ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली़ एमएच ४ क्यू ६२०७ क्रमांकाची परिवहन महामंडळाची बस प्रवाश्यांना घेवून धुळ्याकडून जळगावकडे जात होती़ तर एमएच ४ एफयू ४९८७ क्रमांकाचा कंटेनर हा जळगावकडून धुळ्याकडे येत होता़ कंटेनरच्या पुढे दुचाकी जात होती़ या दुचाकीला ओव्हरटेक करत असताना बसच्या चालकाच्या मागील बाजूला कंटेनरने धडक दिली़ बसच्या सहा आसनी खिडकीजवळ गाडीचा नंबर लिहिलेल्या ठिकाणी पत्रा कापला गेल्याने नुकसान झाले़ या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही़ बस आणि कंटेनरचे नुकसान मात्र यात झाले आहे़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेता कंटेनर चालक पळून गेला आहे़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात बसचालक अतिशसिंग भागवतसिंग परदेशी (३५) यांनी गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार भादंवि कलम २७९, ४२७ आणि मोटार वाहन कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला़ घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आऱ सी़ वाघ करीत आहेत़