शिरपूर : अकुलखेडा गावाजवळ एस.टी. बसने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या थाळनेर येथील नितीन जगन्नाथ साळुंखे (39) यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू ओढवला. दुर्दैवाची गोष्ट ही की, हा अपघात नेमका नितीनच्या बहिणीच्या घरासमोरच घडला़ नितीन दोन दिवसांपूर्वी अकुलखेडा येथील बहीण भारती सुनील बडगुजर यांच्याकडे आणि तेथून काही कामानिमित्त ते सोमवारी चोपडा येथे गेले होते. चोपडय़ाहून मोटारसायकलने (एम़एच़19-एक्यू-1431) परत येताना अकुलखेडा येथे बहिणीच्या घराच्या समोरच शिरपूर आगाराच्या बसने (एम़एच़40-एन-9028) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. भारती यांनी शर्टावरून भावाला ओळखले. त्यानंतर लगेचच नितीन यांना उपचारासाठी चोपडा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून अधिक उपचारासाठी त्यांना नेत असताना मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
बहिणीच्या घरासमोरच भावाचा अपघात; उपचारादरम्यान मृत्यू
By admin | Updated: February 9, 2017 00:37 IST