पोलिसांनी अनेकांना वाहतूक नियम तोडण्याने ऑनलाइन दंड आकारला आहे. मात्र, बहुसंख्य चालकांनी दंडाची रक्कम भरण्यात न आल्याने दंडाची रक्कम कधी भरणार? असा प्रश्न पोलिसांपुढे उभा आहे.
शहरातील वाहनधारकांना शिस्त लागावी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी पोलीस दलातील वाहतूक शाखेच्या वतीने दिवसभर रस्त्यावर थांबून प्रयत्न केले जातात. यात वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, हा महत्त्वाचा मुद्दा असतो. शिवाय, वाहतूक व्यवस्था सुरळीत राहून वाहनधारकांना त्रास होऊ नये, यासाठीही प्रयत्न केले जातात. वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी दररोज शहर वाहतूक शाखेकडून संतोषीमाता, कराचीवाला खुंट, पारोळा रोड, दत्तमंदिर चाैक अशा चाैकांत नो पार्किंगमध्ये वाहन लावणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, विरुद्ध मार्गाने वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे यासह कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे.
शहर वाहतूक शाखेकडून दररोज नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
कोरोनाकाळात मास्क न लावणा-या वाहनांवर आतापर्यंत लाखाेंचा दंड आकारला आहे.