शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतीस्मारकाजवळ दिला ऐतिहासिक स्मृतींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 21:11 IST

चमठाणे  : साळवे येथील खजिना लुटीला १४ एप्रिल रोजी ७५ वर्ष पूर्ण

चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यातील साळवे येथे १४ एप्रिल १९४४ रोजी ऐतिहासिक खजिना लुट केली होती. या घटनेला १४ तारखेला ७५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने साळवे फाट्यावरील क्रांतीस्मारक येथे वैभव नायकवडी यांनी खजिना लुटीच्या स्मृतींना उजाळा दिला.चिमठाणे परिसरातून खजिना कसा लुटण्याचा प्रयत्न झाला, याची साक्ष आजही जशीच्या तशी आहे. नागनाथ आण्णा नायकवडी, जी.डी. लाड, क्रांतिसिंह नाना पाटील, व्यंकट आण्णा रणधीर, शिवाजीराव पाटील, डॉ.उत्तमराव पाटील यांचा खजिना लुटीत सहभाग होता. स्वातंत्र्य लढयात अनेक क्रांतिकारकांनी आपले जीव गमावले, अशा अनेक घटनांची इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंद झाली आहे.  चिमठाणे हद्दीतील या खजिना लुटीच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर क्रांतीस्मारक येथे वैभव नायकवडी यांनी जुन्या काळातील स्मृतींना उजाळा दिला. ते म्हणाले, १४ एप्रिल १९४४ रोजी धुळे ते नंदुरबार दरम्यान खजिना लुटीची जागा  निश्चित करण्यासाठी डॉ.उतमराव पाटील, क्रांतीवीर नागनाथ नायकवडी, क्रांती अग्रणी जी.डी. लाड यांच्या नेतृत्वाखाली एक भूमीगत पथकाची निवड करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.स्वातंत्र्य चळवळ सुरू करण्याकरिता ज्या हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले अशा हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी महादेव जाधव, शिवाजी पाटील, अजित वाजे, संभाजी थोरात, विक्रम पाटील, चिमठाणे गावाचे सरपंच खंडू भिल, वीरेंद्र गिरासे,       साळवेचे माजी सरपंच समाधान बोरसे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे