धुळे : राष्ट्रवादीला खिंडार पाडून भाजपाने महापालिकेवर एकहाती सत्ता काबीज केली. महापाैर पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर अनेकांनी महापाैर पदाची बाशिंग बांधून ठेवली आहे. सत्ताधारी पक्षाकडून जर विद्यमान नगरसेवकांना महापाैर पदाची संधी मिळत नसेल तर त्यांनी पंधरा नगरसेवक सोबत आणा, मी त्यांना महापाैर बनवितो, अशी खुली ऑफर आमदार फारूख शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील शासकीय विश्रामगृहात आमदार फारूख शाह यांनी वर्षपुर्तीचा लेखाजोखा मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. महापाैर पदासाठी ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापाैर होण्यासाठी भाजप व विरोधी पक्षाकडून फिल्डीग लावली जात आहे. मनपात टक्केवारी - लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना टक्केवारी दिल्याशिवाय मनपात कामे होत नाहीत. त्यामुळे सत्ताधारी पक्ष बदनाम झाला आहे. नागरिकांचे प्रश्न सुटत नसल्याने अनेकवेळा आयुक्त व अधिकाऱ्यांची चर्चा देखील झाली. मात्र त्यांनी माझ्या बाेलण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सताधारी काही नगरसेवक माझ्या संपर्कात आहे. पंधरा नगरसेवक आणल्यास मनपात सत्तातंर होऊन एमआयएमची सत्ता बसू शकते. १५ नगरसेवक सोबत आणणाऱ्यास महापाैर पदाची संधी दिली जाईल.भ्रष्टाचारात सर्व सहभागीकोरोना काळात शासनाचा सर्व निधी वापरण्याचा आदेश मनपाला देण्यात आला होता. मात्र मनपाने या काळात ठेकेदाराला १४ कोटीची बिले अदा केली. या भ्रष्टाचारात लोकप्रतिनिधीसह अधिकारी सहभागी आहेत. याप्रकरणाची चाैकशी होण्यासाठी प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे. त्यासाठी धुळ्याचे जिल्हाधिकारी यांना चाैकशीचे आदेश दिले आहे. त्यासाठी लवकरच समिती गठीत केली जाणार आहे. आमदार कुणाल पाटील यांचे विकास कामांचे श्रेय चुकीचे जिल्हा रूग्णालयात शंभर खाटांचे प्रसृतीगृह व रूग्णालय सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्याकडे केली होती. निवेदनाची दखल घेत मंजुरीचे पत्र नाशिक उपसंचालक आरोग्य विभागाकडून माझ्या नावे पाठविण्यात आले आहे. त्यासाठी मी पाठपुरावा केलेला असतांना आमदार पाटील यांनी आपण मंजूर केल्याचा दावा करीत आहे. यासंदर्भात आमदार शाह यांनी मंजुरी पत्र आल्याचा खुलासा केला.तसेच एक वर्षात केलेली विविध विकास कामाची माहिती दिली.
पंधरा नगरसेवक आणा, अन् धुळ्याचा महापाैर व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 23:30 IST