शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पुलावरील मार्ग पादचाºयांसाठी खुला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 23:37 IST

पिंपळनेर : पोलिसांनी आश्वासन पाळल्याने समाधान

लोकमत न्यूज नेटवर्क   पिंंपळनेर : येथील मांजरा नदीवर नवीन बांधलेल्या पुलावर आठवडे बाजारा दिवशी दुकाने मांडणाºया व्यावसायिकांना हटवून पादचाºयांंसाठी हा मार्ग खुला करण्यात आला आहे. येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांनी या संदर्भात कारवाई केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. येथील पोलीस ठाण्यातर्फे नुकत्याच आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत नागरिकांनी गावातील काही समस्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड यांना सांगून तत्काळ कारवाईची मागणी केली  होती. त्या संदर्भात प्राप्त सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन राठोड यांनी त्या बैठकीत दिले होते. मिळालेल्या सूचनांची छाननी करून पोलिसांनी त्यावर काम सुरू केले आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी आठवडे बाजाराच्या दिवशी शुक्रवारी पहावयास मिळाली. गावात मोठ्या प्रमाणात बाजार भरतो. वाहतुकीची समस्या सुटावी यासाठी पांझरा नदीवरील जुन्या पुलालगत नवा मोठा पूल बांधण्यात आला आहे. पुलाच्या पश्चिमेला दीड मीटरचे पादचारी मार्ग (फुटपाथ) ये-जा करण्यासाठी बनविण्यात आलेले आहेत. पण आठवडे बाजाराच्या दिवशी कटलरी व्यवसाय करणारे अनेक व्यावसायिक या पादचारी मार्गांवर सर्रासपणे दुकाने मांडतात. यामुळे वयोवृद्ध महिला-पुरुष तसेच शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना नाईलाजाने पुलावरून चालत जावे लागते. मात्र पुलावरून जड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने नेहमीच अपघाताचा धोका असतो. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती कायम आहे.  त्यावरूनच शांतता कमिटीच्या बैठकीत नागरिकांकडून काही सूचना पोलीस ठाण्यास देण्यात आल्या होत्या.  सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांनी यासंदर्भात आज आपल्या पथकासह कारवाई करत व्यावसायिकांना उठवून लावली. पुन्हा ते येऊ नयेत यासाठी दिवसभर याठिकाणी पोलीस तसेच त्यांची वाहने तैनात करण्यात आली होती. पादचारी मार्ग खुला असल्याने त्यावरून ये-जा करणाºया नागरिकांनी पोलिसांच्या कारवाई संदर्भात समाधान व्यक्त केले आहे. तसेच यापुढेही हा मार्ग कायमस्वरूपी खुला राहावा यासाठी पिंपळनेर व सामोडे ग्रा.पं.नी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त झाली. 

टॅग्स :Dhuleधुळे