शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात मराठीच्या पेपरला कॉपी करतांना दोघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 16:18 IST

भरारी पथकांच्या भेटी, ६३ केंद्रावर ३० हजार ४७८ विद्यार्थी प्रविष्ट

ठळक मुद्देकॉपीचे किरकोळ प्रकार वगळता परीक्षा शांततेतभरारी पथकांनी दिल्या भेटीमुख्य कार्यकारी अधिकाºयांनीही काही केंद्राची केली पहाणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महाराष्टÑ राज्य माध्यमिक मंडळ शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाºया दहावीच्या परीक्षेला गुरूवारपासून सुरूवात झाली. मराठीच्या पेपरला कॉपी करतांना भरारी पथकाने दोन विद्यार्थ्यांना पकडले. ग्रामीण भागातील काही केंद्रावरही किरकोळ कॉपीचे प्रकार घडले.या परीक्षेसाठी जिल्ह्यात ३० हजार ४७८ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. ६३ केंद्रावर ही परीक्षा सुरू झालेली आहे. धुळे शहरात १३ केंद्रावर ही परीक्षा होत असून, जिल्ह्यात फक्त ४ उपद्रवी केंद्राची नोंद आहे.दहावाजेपासूनच गर्दीबोर्डाचा पहिला पेपर असल्याने, सकाळी  दहावाजेपासूनच परीक्षा केंद्रात  विद्यार्थ्यांची गर्दी होऊ लागली होती. केंद्रात आल्यावर अनेक विद्यार्थी आपला नंबर कोणत्या हॉलमध्ये आहे, याची चाचपणी करतांना दिसून येत होते.परीक्षार्थींना केंद्रापर्यंत सोडण्यासाठी काहींचे पालक, मित्र आल्याने, केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. त्यामुळे   परीक्षा केंद्राबाहेर वाहतुकीची कोंडी झालेली होती.प्रवेशद्वाराजवळच अंगझडतीबारावीच्या परीक्षेला झालेला कॉपीचा प्रकार बघून मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी केंद्रसंचालक, पर्यवेक्षकांची चांगलीच कान उघडणी केली होती. परीक्षा केंद्रात कॉपी झाल्यास, गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्याचा परिणाम दहावीच्या पेपरला दिसून आला. कॉपी होवू नये म्हणून विद्यार्थी-विद्यार्थिनींची शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच तपासणी केली जात होती. त्यानंतरच विद्यार्थ्यांना आत सोडण्यात येत होते.१०.५० वाजता विद्यार्थ्यांच्याहाती पेपर१०.५० वाजताप्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातीयावेळी परीक्षा केंद्रात १०.५० वाजताच विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्न पत्रिका मिळाली. त्यामुळे दहा मिनीटे विद्यार्थ्यांना पेपर अवलोकन करण्यास अवधी मिळाला.दरम्यान परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांसमक्षत प्रश्नपत्रिकेचे पाकीट उघडण्यात आले.दोन विद्यार्थ्यांना पकडलेपेपर सुरू असतांना माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांनी धुळ्यात एकाला तर माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणे यांनी पिंपळनेर येथील केंद्रावर एका विद्यार्थ्याला मराठीच्या पेपरला कॉपी करतांना पकडले.भरारी पथकांच्या भेटीदरम्यान परीक्षेसाठी पाच भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली असून, या पथकांनी वेगवेगळ्या केंद्रांना भेटी दिल्या.