लोकमत न्यूज नेटवर्कलामकानी :राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत देण्यात येणारा तालुकास्तरीय स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार धुळे तालुक्यातील बोरीस ग्रामपंचायतीला देण्यात आला.जिल्हा परिषदेच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे.तडवी, महिला व बालकल्याण समिती सभापती धरती देवरे, उद्योजक निखील सुभाष देवरे, सरपंच वत्सलाबाई साहेबराव कुंवर, उपसरपंच दिलीप नाटू बेहरे, ग्रामविकास अधिकारी भास्कर सोनवणे आदी उपस्थित होते.बोरीसच्या सरपंच वत्सलाबाई कुंवर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तालुकास्तरीय स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून निवड झालेल्या ग्रामपंचायतीस ८ लाख ७३ हजार ९०६रूपये अनुदान मिळणार आहे. ग्रामपंचायत अंतर्गत हे अनुदान ग्रामीण विकास कार्यक्रम, स्मार्ट ग्राम योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी वापरण्यात येईल.या कार्यक्रमाला माजी उपसरपंच विश्वास सिताराम पाटील, ग्रा.प.सदस्या सरूबाई उत्तम भिल, कल्पनाबाई शत्रुघ्न भिल, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजेंद्र एकनाथ देवरे, गौरख महारु भिल, विजय हंसराज देवरे, प्रदीप साहेबराव कुवर, जगन्नाथ देवरे आदी उपस्थित होते.
बोरीसला स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:48 IST